कार्ला :
सांगिसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचदी श्रद्धा महेश
दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीत बुधवडी, वेल्हवळी याही गावांचा समावेश होतो.
उपसरपंच विष्णू जाधवयांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.
सरपंच बबन टाकळकर यांच्या अध्यक्षतेखाली
ग्रामपंचयात कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.उपसरपंच पदाच्या निवडणूकीसाठी निर्धारित वेळेतश्रद्धा दळवी यांचा एकमेव अर्ज आल्याने बैठकीचे अध्यक्ष सरंपच बबन टाकळकर व
ग्रामसेवक जी.पी.सानप यांनी दळवी यांची उपसरपंचपदी निवड जाहीर केली.
माजी उपसरपंच माउली भांगरे, विष्णू जाधव, सदस्यविलास मानकर, शोभा गरुड, संगीता टाकळकर, चंदा पिंगळे, संपतगरुड, गणेश दळवी, अनिल गरुड, महेश दळवी, अजित बांगर आदींनी उपसरपंचदी निवड झाल्याबद्दल दळवी यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!