टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक फळणे फाटा येथे वडगाव मावळ अंकित
पोलीस दूरक्षेत्र (पोलीस चौकी) सुरु करण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलचे माजी अध्यक्ष काळुराम मालपोटे,मावळ तालुका राष्ट्रवादी यूवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले,विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष मारूती असवले, देवस्थान समितीचे सचिव राजू शिंदे यांच्यासह अन्य नागरिकांनी केली आहे.
आंदर मावळातील पंचेचाळीस गावची मुख्य बाजारपेठ टाकवे बुद्रुक आहे.या गावात पोलीस चौकीची अंत्यंत गरज आहे सध्या फळणे फाटा येथे पोलीस स्टेशन चेक नाका आहे .वडगाव मावळ येथे या परिसरातील नागरिकांना जावे लागत आहे.साधारण ५० ते ६० किलोमीटर अंतर बडगांव मावळ पोलीस स्टेशन आहे. खांडी ,सावळा,माळेगांव,अशी इतर पन्नास गावे आहेत. या अंदर मावळ भागातील अंदाजे लोकसंख्या ४० ते ५० हजार आहेत.
या भागामध्ये अनेक पर्यटक येताय व टाकवे गध्ये फार मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे या भागातील कामगार रात्री अपरात्री जीव मुठीत घेऊन प्रवास करतात तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रकार घडतात.तसेच या भागात अनेक गुंड प्रवृत्तीला नागरिक घाबरलात.
उदारणार्थ काही महिन्यापूर्वी
बहानगांव येथे हत्या झाली २) माऊ येथे हत्या झाली ३) टाकवे येथे हत्या ४) कान्हे येथे हत्या देखील झाली आहे
असे मारामारीचे प्रकार अनेक वेळा या भागात होत असतात तसेच टाकवे येथे सोमवार आठवडे बाजार असतो.
मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते या परिसरात कॉलेजच्या मुलींची व महिलांची छेडाछेडीचे प्रकार होतात.तसेच या परिसरात अवैध धंद्यांना देखील आळा बसेल टाकवे बु ग्रामपंचायतीची लोकसंख्या देखील साधारण १२ हजार आहे .त्यामुळे टाकवे बुद्रुक फळणे फाटा येथे कायम स्वरूपी वरिष्ठ अधिकारी नेमून पोलीस
दूरक्षेत्र (पोलीस चौकी) सुरु करावी च आमची होणारी गैरसोय दूर करावी.

error: Content is protected !!