वडगाव मावळ :
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या
कार्याध्यक्षपदी अतुल चंद्रकांत राऊत यांची निवड करण्यात आली.ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी राऊत यांची निवड जाहीर केली.
यावेळी प्रदेश सचिव प्रविण मांडे, मावळ प्रभारी, मंगेश
खैरे, उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, अवधूत गायकवाड उपस्थित होते.
अतुल राऊत हे राष्ट्रवादीचे क्रियाशील कार्यकर्ते असून,
ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष, ओबीसी सेल सोशल मीडियाचे प्रदेश प्रभारी म्हणून काम करीत आहेत, मावळ तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांवर ते कार्यरत आहेत.
कोरोना संकटात सोशल मीडियाचा
वापर करून त्यांनी असंख्य रुग्णांना बेड, रुग्णवाहिका, प्लाझ्मामिळवून देण्यासाठी मदत केली आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षबबनराव भेगडे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, विठ्ठलराव शिंदे, गणेशखांडगे, गणेशअप्पा ढोरे, सुभाषराव जाधव आदींनी राऊत यांचा निवडीबद्दल सत्कार केला.

error: Content is protected !!