राजगुरुनगर :
सुप्रसिद्ध निवेदक सुनील थिगळे यांचे अल्पशा
आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली,
जावई असा परिवार आहे.
प्रसिद्ध निवेदिका पूजा थिगळे व मेघा थिगळे यांचे ते वडील होत. सव्वामहिन्यापूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह होऊन कोरोनातून.मुक्त झाले होते.
पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाने खेड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातून
हळहळ व्यक्त होत आहे.. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे
पदाधिकारी व आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे
कट्टर समर्थक होते. सुनिल थिगळे यांच्या आवाजात जादू होती,उत्कृष्ट सुत्रसंचालक अशी महाराष्ट्रभर त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने निवेदकांचा मार्गदर्शक हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
सुनील थिगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

error: Content is protected !!