पुणे:
पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर, वांद्रे, कळकराई या ठिकाणी रोपवे करावेत अशी मागणी भिमाशंकर परिसर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसनराव गोपाळे यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन,गोपाळे यांनी भिमाशंकर, वांद्रे, कळकराई या ठिकाणी रोपवे बनवण्यात यावा विनंती केली आहे. इंग्रजांच्या काळात, माथेरान, महाबळेश्वर व इतर पयर्टन क्षेत्राचा विकास झाला.
आज महाबळेश्वर व माथेरान ही सर्व ठिकाणे सर्व सामान्य जनतेच्या खिशाला परवडतील
अशी राहिलेली नाहीत. या शिवाय पर्यटन वाढीसाठी अशा रोपवेची गरज आहे,याकडे लक्ष वेधून गोपाळे म्हणाले,
शासनाने भिमाशंकर, वांद्रे व कळकराई-सावळे याठिकाणी रोपवेबनविण्यासाठी सर्वेक्षण पहाणी करून टेन्डर काढले.तर अनेक खाजगी कंपन्या पुढे
येतील. टोल घेवून रस्ते बांधणी केली जाते त्याप्रमाणे रोपवेची उभारणी करणे सहज शक्य होणार आहे.
महाड येथील रायगड रोपवे खाजगी कंपनीने बनवीला आहे त्याचप्रमाणे वरील ठिकाणी रोपवे बनविण्याची इच्छा-शक्ती शासनाने दाखविली तर डोंगरी मागास भागाचाविकास होईल.
दळण-वळणाचे साधन व पर्यटन विकास हया दोन्ही गोष्टी इच्छा-शक्तीदाखविली तर सहज शक्य होणार आहे.
आमच्या या विनंती अर्जाचा विचार करून सर्वेक्षण पहाणी करावी.
अधिक माहितीसाठी:अध्यक्ष किसनराव गोपाळे
मो.नं.७५८८६२६०९९

error: Content is protected !!