
वडगाव मावळ:
वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पुढाकाराने
कोरोना काळात लहान मुलांसाठी स्वतःमधील कला कौशल्य दाखवण्याच्या उद्देशाने “एक आठवडा बालमित्रांचा” या उपक्रमाअंतर्गत २१ ते २८ एप्रिल दरम्यान घरबसल्या चित्रकला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नृत्य स्पर्धा इत्यादी Online स्पर्धा राबविण्यात आल्या होत्या.
आज या तीनही स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांचे पारितोषिक विजेते तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना बक्षिसे घरपोच जाऊन देण्यात आली.
“एक आठवडा बालमित्रांचा” या स्पर्धात्मक उपक्रमास ३१९ एवढ्या मोठ्या प्रमाणावर बच्चे कंपनीचा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा निकाल ६ मे रोजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अधिकृत फेसबुक पेज वर घोषित करण्यात आला होता, आज प्रत्यक्षात विजेत्या स्पर्धकांना तीन सायकल, तीन कॅरम बोर्ड, तीन बॅडमिंटन किट तसेच उत्तेजनार्थ बुकस/रंगपेटी सेट इत्यादी बक्षीसे देण्यात आली.
लहान मुलांनी घरात सुरक्षित राहून सदरची स्पर्धा खूप छान पद्धतीने इन्जाॅय केली.
आम्ही लहान मुलांकरिता आॅनलाईन पद्धतीने राबवलेल्या या स्पर्धेचे पालक वर्गाने विशेष कौतुक केले.

