वडगाव मावळ :
चक्री वादळाच्या धर्तीवर मावळ तालुक्यात हाय अलर्ट केल्याची माहिती प्रभारी तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.अरबी समुद्राच्या जवळ मावळ तालुका येत असुन मागील वर्षी ३ जून २०२० रोजीच्या  निसर्ग चक्री वादळाचा फटका तालुक्याला बसला आहे.
हा अनुभव पाहता, दिनांक.१५व १६ मे रोजी चक्रीवादळ येण्याची श्यक्यता आहे. यामध्ये ताशी ५० किमी वेगाने वारे वाहण्याची तसेच  अतिवृष्टी होण्याची, श्यक्यता आहे. तेव्हा  सर्व नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
या दिवशी अति पावसाने लाईट जाण्याची श्यक्यता आहे तेव्हा घरात  मेणबत्ती,ब्याटरी उपलब्ध  ठेवावी सर्वांनी आपली स्वतःची व पशूधनाची काळजी घ्यावी व सतर्क रहावे नागरिकांनी घराबाहेर पडू नये.धोकादायक वीज खांब, घरे व झाडे यापासून दूर राहावे, असे आवाहन चाटे यांनी केले.
धोकादायक होर्डिंग्ज व फ्लेक्स बाजूला काढावे. जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. 
शुक्रवारी (दि.१४) वादळी वाऱ्यासह पाऊस पडला असुन तो वादळाचा पाऊस होता.वादळामुळे कोणाचे वित्त व जीवित नुकसान झाल्यावर माहिती मावळ तहसीलदार कार्यालयाला द्यावी. असे ही आवाहन तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी केले आहे.

error: Content is protected !!