पवनानगर( नवनाथ आढाव):
रेशनिंग दुकानदाराशी झुज्जत घातल्या शिवाय रेशनिंग मिळाले असे वाटतच नाही. रेशनिंग दुकानदाराच्या तक्रारीचा पाढा वाचला तर तो कमी पडेल. तांदूळ, गहू आणि साखर घेण्यासाठीची दुकानदार आणि शिधापत्रिका धारक यांची बाचाबाची आपण कित्येक वेळेस पाहिली.
कित्येक गावक-यांनी हा वाद गावातच सोडवला. कित्येक वेळेस हा वाद प्रशासनापुढे गेला.
मागच्या वर्षी कोरोनाच लाॅकडाऊन पडल गरीब घरचे दोन वेळेच अन्न शिधापत्रिकेवर मिळालेल्या तांदूळ व गव्हाच्या धान्याने शिजल.
कोरोनाचे मागचे वर्षे सरल आणि यंदाही कोरोनाने तेच थैमान मांडले, पुन्हा मागच्या सारखे दिवस. विनाकारण घराबाहेर पडू नका, काळजी घ्या, हाताला काम नसल तरी पोटाला दोन घास चुकल कुठे? पुन्हा शिधापत्रिकेवर आलेल्या धान्यावर गरिबाची चूल पेटणार.
पुन्हा दुकानदाराच्या दारात जाणे आले.वाढत्या कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मावळात सक्तीचा लाॅकडाऊन झाला. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा शासनाने आदेश काढला. नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. कोरोनाच्या महामारीत नागरिकांना घरा बाहेर न पडता रेशनिंग मिळावे,म्हणून
माता रमाई महिला बचत गट काले तील रेशन दुकानदार देवानंद भालेराव यांनी आज शेवती गावात जावून पात्र कार्डधारक यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजना चे मोफत गहू व तांदूळ वाटप केले. भालेराव यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. सगळ्या दुकानदारांनी याचे अनुकरण करावे अशी मागणी वाढू लागली आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात जर हे असे गावोगाव सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळुन रेशन वाटप होत असेल तर चांगलच आहे.
सामान्य नागरिक राहुल कालेकर

error: Content is protected !!