पवनानगर:
पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वर झालेल्या अपघातात तरूणाचा जागेवरच मृत्यू झाला. यश पांडुरंग कुंभार (वय १९ ) रा.पवनानगर असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.
यश उर्सेतील जयहिंद कंपनीत कामाला होता. शुक्रवारी ता.१४ ला तो नेहमी प्रमाणे कामाला गेला.कामावरून घरी येताना बौर ता. मावळ येथे मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर लेन कि. मी. नं. ७५,८०० जवळ रोड पायी जाताना रस्ता क्रॉस करीत असताना रात्री ७:४५ वाजण्याच्या सुमारास येथून भरधाव वेगात जाणारी मारूती स्वीफ्ट कार नं-एम एच १२/आर एफ/५२२८ या
कारने त्यास धडक दिल्याने अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई ,वडील बहिण असा परिवार आहे.

error: Content is protected !!