माळेगाव बुद्रुक, आंदर मावळातील शेवटच्या टोकावरील लहानसे खेडे, शेती आणि दुधधंदा हेच उपजीविकेचे मुख्य साधन. पंचवीस वर्षापूर्वी मुलांना शिकायचे तर घर सोडून शहर गाठावे लागयचे. मुंबई हे शहर जवळचे वाटायचे. त्याच कारणही तस होत, पंचक्रोशीतील अनेकांचे संसार मुंबईत हमालाची नोकरी करून सावरले होते.
फुलांचा धंदा, हमाली, गॅसचा बोझा वाहून कित्येकांच्या घराची चूल पेटत होती. प्रपंचाचा हा रहाटगाडा चालताना मुले ही शिकत होती. असाच आपला ही प्रपंच बहरावा म्हणून दहावी उत्तीर्ण होऊन या विद्यार्थ्याने मुंबई गाठली. या विद्यार्थ्याचे नाव, बाळासाहेब घाडगे.
त्याचे शिक्षण बाहेर गावी झाले,
१९८३ ते १९९३ या दहा वर्षात त्याने दहावीपर्यंत खेड तालुक्यात घेतले.
त्यानंतर ११ वी १२ वीच्या शिक्षणासाठी मुंबई गाठली, येथे दिवसभर काम करून रात्रीच्या कॉलेजात त्याने शिक्षण पूर्ण केले.मुंबई येथेच लहान मोठ्या कंपनीमध्ये काम करून चार पैसे गाठीला जमवले. आणि आंदर मावळातील इंगळुनच्या श्री जगन गायकवाड यांच्या मुलीशी १९९९ मध्ये त्याचे लग्न झाले.आज त्यांच्या संसाराला इतकी वर्षे झाली. १४मे ला हा तरूण विवाहबंधनात अडकला.
लग्न झाल्यावर स्वतःची खोली नाही म्हणून पत्नीला गावाला सोडून कामासाठी पुन्हा मुंबईला गेला, कमी पगार, आणि स्वतःचे आणि पाठच्या भावाचे लग्न केल्यामुळे थोडेफार झालेले लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी मुंबई धरावी लागली. मुंबईमद्धे भाड्याचे घर त्यातच तुटपुंजा पगार, यात मन रमत नव्हते, गावी पत्नी, आई, वडील यांची जबाबदारी होतीच.
शेवटी २००३ ला मुंबई सोडून गावी भाऊ यांना सोबतीला घेऊन शेती आणि दुग्ध व्यवसाय करून संसाराला सुरुवात, हे करून समाजाचे आणि राजकीय काम सुरू, अंदर मावळमधील आपल्या समाजाला जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, पंचायत समितीच्या योजना, जिल्हा परिषदेच्या योजनेचा लाभ, अशी कामे करून तालुक्यात नाव मिळवले.
तालुक्यातील आणि विशेषतः अंदर मावळमधील सर्व बहुजन समाजात मिळून मिसळून काम करणे ही सामाजिक जबाबदारी करताना कुटुंबाच्या पालनपोषण साठी स्वतःच्या हिमतीवर जागा घेऊन किराणा दुकान टाकले.पायपीट करीत होणारा प्रवास आता चारचाकी तून होतोय. मुलेही शिकून मोठी झाली आहे. मुलगा बारावी उत्तीर्ण होऊन आयटीआयचा कोर्स करतोय .मुलगी विज्ञान शाखेतून शिकली.
जिवाभावाच्या या मित्रांच्या Anniversary ला शुभेच्छा देताना गतकाळ आठवला. मित्रा कौटुंबिक जबाबदारी पेलताना सामाजिक कार्याचा डोंगर असाच उभा करून सामाजिक हित जपत रहा याच शुभेच्छा आजच्या दिनी.

error: Content is protected !!