वडगाव मावळ:
गडकल्याण प्रतिष्ठान मावळ तालुका विभाग यांच्या वतीने कांब्रे(आं.मा) ऐतिहासिक लेणीच्या जतन आणि संवर्धन च्या अनुषंगाने पर्यटकांना रस्ता व अनेक सुख-सुविधेच्या येत असलेल्या अडचणीं बाबत डाहुली ग्रामपंचायत चे सरपंच,उपसरपंच ग्रामसेवक यांना लेखी निवेदन दिले.
यावेळी कांब्रे(आं.मा) लेणीं च्या जतन आणि संवर्धन बाबत सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही ग्रामपंचायत चे सरपंच मा.नामदेवराव शेलार,उपसरपंच सौ.संगीता पिंगळे, विद्यमान सदस्य बळीरामशेठ वाडेकर यांनी दिली.
यावेळी ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच श्री.नामदेवराव शेलार,उपसरपंच सौ.संगीता पिंगळे, ग्रामसेवक पाटील भाऊसाहेब,विद्यमान सदस्या सौ.वैजंती आलम,सौ.अंजनाताई ठिकडे,सौ.जनाबाई कुडे,सौ.पूजा पिंगळे, गडकल्याण प्रतिष्ठान मावळ तालुका अध्यक्ष कु.मुकुंद शेलार,पै.आनंद आलम,पै. अमोल जाधव,पै.किरण आंबेकर,ग्रामपंचायत कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होत्या.
मावळ तालुक्यातील अनेक ठिकाणी ऐतिहासिक व पुरातन वास्तूंना नवसंजीवनी देण्याचं काम स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केलं जाईल अशी माहिती गडकल्याण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री.सुभाषराव आलम-देशमुख यांनी दिली

error: Content is protected !!