
कामशेत:
जमावबंदी व जुगारबंदी असताना देखील बेकायदेशीरपणे जमाव जमवुन तीन पत्ती फ्लॅश जुगार खेळणा-यांवर कामशेत पोलिसांनी बुधवारी (दि.१२)ला रात्री छापा टाकून बारा शहरातील बड्या व्यपाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. लॉकडाऊनच्या या नियमांचे उल्लंघन करून येथील ललित कलेक्शन मध्ये जमाव जमवून तीन पत्ती फ्लॅश नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना मिळाली होती.
त्यानुसार पोलीस निरीक्षक जगताप आणि सहकाऱ्यांसह ललित कलेक्शन मध्ये बुधवारी (ता.१२) रात्री छापा मारला. या छाप्यात ललित उत्तमचंद्र चोपडा (वय५५),विशाल सुभाष शिंदे (वय ३१), महेंद्र हिरालाल टाटीया (वय ५१), दीपक पोपटलाल जैन (वय ३८), संजय बाबुलाल ओसवाल (वय ५०), राजू बन्सीलाल ओसवाल(वय ५०), विकास विनायक जोशी (वय ५०), महेश इंदरमल गदीया (वय ४२), रोनीत रणजित गदिया (वय २६), पियुष ललित चोपडा (वय २७), जिगर विलास पितानी (वय २६), व निखिल राजेश परमार (वय२८) हे बारा जण जुगार खेळताना मिळून आले आहे.
त्यांच्याजवळ २३ हजार ९९० रुपयांची रोख व ५२ पाणी ४ पत्याचे केट एक वही असा मुद्देमाल मिळून आला आहे. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करत आहेत.

