तळेगाव दाभाडे:
महाराष्ट्राच्या राजकारणात या पुढील काळात पंढरपूर पॅटर्न राबविणयाचा भाजपाचा अजेंडा असेल असे सुचोतावाच पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी केले.
आमदार आवताडे यांच्या विजयाचे शिल्पकार महाराष्ट्रचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या आभाराच्या कार्यक्रमात आवताडे यांनी पंढरपूर पॅटर्नचे महत्व अधोरेखित करीत भाजपाच्या व बाळा भेगडे यांच्या ॠणात राहून सातत्याने विधायक काम करीत राहणार असल्याची ग्वाही दिली.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले आमदार समाधान आवताडे यांनी बाळा भेगडे यांचा जाहीर सत्कार करून आभार मानले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,नगराध्यक्षा चित्रा जगनाडे,उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी असलेले माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकची जबाबदारी दिली आणि बाळा भाऊ यांनी व त्याच्या टीमने केलेल्या नियोजनातून हे यश मिळाल्याचे आवताडे यांनी स्पष्ट केले.
समाधान आवताडे म्हणाले, आमच्या मतदारसंघात तिरंगी लढतीची परंपरा आहे,मी यापूर्वी दोन निवडणुका पराभूत झालो,यावेळेस आलेले यश हे बाळा भाऊ यांच्या नियोजनाचे आहे. मागील आठवड्यात माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली,या भेटीला बाळा भाऊ होते. राज्यांच्या राजकारणात प्रतिष्ठेची ठरलेल्या आमच्या मतदारसंघातील निवडणुकीचा पॅटर्न राबविणार चर्चा झाली.
राजकीय यशात सिंहाचा वाटा असलेले माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे आभार मानताना आपण कायम ऋणात राहून काम करू असा विश्वास आमदार आवताडे यांनी दिला.

error: Content is protected !!