
तळेगाव स्टेशन:
कोरोनाने खूप काही शिकवले, प्रत्येक गोष्टीचे मूल्य किती महत्वाचे आहे,याची जाणीव करून दिली. आता हेच पहा ना,कोरोना बाधीत रूग्णांना ऑक्सिजन अत्यावश्यक आहे. आणि ऑक्सिजन मिळविण्यासाठी धावाधाव सुरू आहे.
कोरोना बाधीत रूग्णांच्या नातेवाईकांपासून अगदी प्रशासनातील सर्वाची ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी धांदल उडली आहे. पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी शासनाकडून निधीही उपलब्ध करून दिला जात आहे.
इतकेच काय ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या कामालाही गती मिळाली.ऑक्सिजनची ही झाली कृत्रिम निर्मिती,पण आपल्या सर्वाना आवश्यक असणारा प्राणवायू झाडाझुडपांकडून आम्हाला सहज मिळतो आणि तोही अगदी मोफत. पण ज्यांचे नातेवाईक कोरोना बाधीत झालेत,त्यांनी ऑक्सिजन साठी धावपळ केली,विनंत्या केल्या आहेत. आणि ऑक्सिजन लावल्या डिस्चार्ज घेताना ऑक्सिजन साठी किती पैसे मोजलेत त्यांना ऑक्सिजनची किंमत विचारा ,हे सगळे मांडण्याचे कारण,
आज देशी वृक्ष लावून ती जगवून ऑक्सिजनची निर्मिती काळाची गरज बनली आहे.आपलाही सामाजिक कार्यात योगदान असावे म्हणून मावळ तालुक्यातील गोळेवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री जगन तुकाराम दाभाडे व त्यांच्या सौ. मंगल जगन दाभाडे यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आज शेताच्या बांधावर वृक्षारोपण केले आणि लावलेली झाडे जगवण्याचा संकल्प केला.
त्यांच्या
विवाहास आज पस्तीस वर्षे झाली. वृक्षारोपण करून त्यांनी आपल्या लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस साजरा केला .कोरोना काळात अतिशय साध्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी राखत वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे
दरवर्षी ते आपला वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करतात. गावातील सामाजिक क्षेत्रामध्ये या कुटुंबाचे मोलाचे योगदान आहे.त्यांना तीन मुली एक मुलगा नातवंडे आहे. आई बाबांच्या हा समाजोपयोगी उपक्रमाचे आपणही अनुकरण करू असा शब्द त्यांनी दिला त्यांचा मुलगा सागर दाभाडे हे व्यवसायिक आहे व राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे .तोही याच पावलावर पाऊल टाकून सामाजिक हिताची जपवणूक करील असे दिसतेय.

