कामशेत:
घरच्या वातावरणातून थेट दवाखान्याच्या आयसीयू मध्ये रूग्ण आला की,त्यावर दडपण येतेच अशा वेळी सहज संवाद साधून त्याला बोलके केली की,त्याच्या मनावरच दडपण कमी होते.बाकी त्याच्यावर उपचारासाठी डाॅक्टर आहेच.डाॅक्टरांनी दिलेल्या सूचना नुसार आम्ही औषधोपचार करीत असतोच.
दवाखान्यात दाखल झालेल्या रूग्णांशी प्रेमाने बोलल तरी त्याचा निम्मा आजार कमी होत असल्याचा अनुभव कामशेतच्या महावीर हाॅस्पिटल मधील परिचारिकांनी सांगितला.
परिचारिका दिना निमित्त येथील परिचारिका आपले अनुभव सांगत होते.रूपाली साळुंके म्हणाली मी बारावी पर्यत शिक्षण घेतले. माझे सासरे आरोग्य विभागात पर्यवेक्षक होते.त्यामुळे आरोग्य व्यवस्थापनाशी आमचे कुटुंबिय परिचित होते,त्यामुळे लग्नानंतर सासरच्यांना मार्गदर्शनाखाली मी नर्सिगला प्रवेश घेतला. नर्सिगचा कोर्स करून झाला.
आज माझ्या नोकरीला दहा वर्षे झाली. या दहा वर्षात सर्वसामान्य रूग्णांची सोय करू शकले याचे मोठे समाधान आहे आज मी महावीर हाॅस्पिटल मध्ये कोविड सेक्शनला आयसीयु काम करते. कोरोनाने भयभीत झालेले रूग्ण आयसीयू मध्ये दाखल केले की,त्यांना योग्य समुपदेशन करून आम्ही आधार देतो. रूग्णांशी प्रेमाने बोलणे,डाॅक्टरचा सल्ला,सूचनेनुसार रुग्णसेवा करताना सामाजिक भावनेतून आम्ही हे काम करतो याचा आम्हाला अभिमान आहे.
दवाखान्यात वेगवेगळ्या व्याधींनी त्रस्त असलेले मंडळी येत असतात,कोणाला ताप,थंडी,उलटी हे आजाराचे अनेक रूग्ण आम्ही पाहतोच. कोरोनाचा संसर्ग झालेले,अपघात झालेले अनेक दवाखान्यात दाखल झालेले असताना आम्ही त्याची सेवावृत्तीने देखभाल करीत असल्याचे
सुरेखा खैरवाड, ,स्वाती खंडाते,रेणुका कांबळे,शुभांगी शिंदे, कावेरी मोरे,ममता देवडा,प्रतिक्षा पवार , स्वाती वाघमारे या परिचारिका सांगत होत्या.

error: Content is protected !!