
वडगाव मावळ:
कांब्रे ना.मा. ग्रामपंचायतील कोंडीवडेच्या प्रगतीनगर येथील ग्रामस्थांनी २० वर्षापासुन प्रलंबित असणारा रस्त्याचा प्रश्न जनसेवक पै.देवाभाऊ गायकवाड यांच्या पुढाकाराने मार्गी लागला.
स्थानिक रहिवाशांनी हा प्रश्न देवाभाऊ यांच्या पुढे मांडला लगेच देवाभाऊ गायकवाड यांनी ग्रामपंचायत मधील सरपंच उपसरपंच व सदस्य यांना घेऊन २० टक्के समाजकल्याणमधुन मंजुर हे काम मार्गी लावले.
स्थानिक ग्रामस्थांच्या जागेविषयी असणाऱ्या अडचणीमुळे हा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून सुटत नव्हता, देवाभाऊ गायकवाड यांनी सर्व स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून मार्ग काढल्याने आज रस्ता पुर्ण झाला.
माजी उपसभापती श्री.गणेशभाऊ गायकवाड व जनसेवक पै.देवाभाऊ गायकवाड यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच सौ.सुवर्णाताई गायकवाड, उपसरपंच श्री. किरण गायकवाड ,सदस्य श्री.स्वामीभाऊ गायकवाड, सौ.कविताताई गायकवाड, सिमाताई गायकवाड, सौ. पिंकीताई राऊत मा. उपसरपंच श्री. काळुराम गायकवाड जेष्ठ नेते श्री. भरत गायकवाड ,श्री. विष्णु गायकवाड,
श्री. तुकाराम धुमाळ मा. सदस्य श्री. मारूती गायकवाड. पो.पाटील सौ.रोहीणीताई अतुल चोपडे.. श्री. अनिल गायकवाड, श्री. सोपान गायकवाड, श्री.सुनील लोखंडे व ग्रामस्थ तुरूण सहकारी उपस्थित होते..यावेळी ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त करताना आनंद व्यक्त केला पै. देवाभाऊ गायकवाड व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या कामाबद्दल कौतुक केले.

