वडगाव मावळ :
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नाने वडगाव मावळ येथील वैकुंठ स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे, येत्या दहा दिवसातच गॅस शवदाहिनी प्रकल्प सुरु होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी माहिती दिली.
तालुक्यातील कोरोनाच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा ताण तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीवर पडत असून अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांची गैरसोय असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२०-२०२१ नावीन्यपूर्ण योजनेतून गॅस शवदाहिनी प्रकल्प उभारण्यासाठीचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी  आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सादर करण्यात आला होता.
 या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार हा प्रकल्प उभारण्यासाठी ८० लाख ४८ हजार रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. त्यामुळे गॅस शवदाहिनी प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी महामार्गालगतच्या कान्हे व साते स्मशानभूमीत लाकडावर अंत्यसंस्कार करत आहेत. लाकडावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने धुरामुळे  पर्यावरणाचे प्रदूषण होत आहे. मावळ तालुक्यातील मृतदेहावर सद्यातरी तळेगाव दाभाडे येथील गॅस शवदाहिनीवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. अंत्यसंस्कार करण्यासाठी नंबर लावून प्रतीक्षा करावी लागत असल्याने नातेवाईकांची गैरसोय होत असून त्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत गॅस शवदाहिनी काळाची गरज आहे. हि गरज ओळखून प्रथम नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी पुढाकार घेवून मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नाने गॅस शवदाहिनी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. केवळ दहा दिवसातच गॅस शवदाहिनी सुरु करणार असल्याचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी सांगितले.

error: Content is protected !!