
वडगाव मावळ;
मावळ तालुक्यातील वाढत्या कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या उपाययोजना संदर्भात पंचायत समिती सभागृहात माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आढावा बैठक घेतली.
मावळ तालुक्याला प्राप्त होणार लसीकरणाचा साठा स्थानिक नागरिकांना उपलब्ध होत नसून 30% स्थानिक तर 70%नागरिक बाहेरील असून यावर प्रशासनाने योग्य असे नियोजन करण्याचे गरज असून व लसीकरण रजिस्ट्रेशन साठी वापरल्या जाणाऱ्या कोवीन वेबसाइट मध्ये बदल करण्याचे गरज असून अभियांत्रिकी क्षेत्रातील नागरिक चुकीच्या पद्धतीने लस बुक करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत , असल्याचे भेगडे यांनी प्रशासनाला सुनावले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त होणारे रेमडीसीव्हर इंजेक्शन अजूनही सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होत नसून रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे रुग्णानाच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी मोठी आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे, असे स्पष्ट केले.
कोरोना रुग्णांना संजीवनी ठरत असलेल्याला प्लाझ्मा साठी मोठी कसरत करावी लागत आहे मावळ तालुक्यातील असंख्य नागरिक पुणे पिंपरी-चिंचवड येथे प्लाज्मा साठी धडपड करत आहेत.जर मावळ तालुक्यात प्लाझ्मा सेंटर उभारले तर वेळेवर तालुक्यातील नागरिकांना प्लाज्मा उपलब्ध होऊ शकतो असे भेगडे यांनी या बैठकीत सुचवले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,उपसभापती दत्ता शेवाळे,माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर,माजी उपसभापती शांताराम कदम,पंचायत समिती सदस्य सुवर्णा कुंभार,ज्योती शिंदे,बाळासाहेब घोटकुले आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

