
कामशेत:
कोरोनाच्या संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डाॅक्टरांना,कर्मचा-यांना आणि हाॅस्पिटलला बदनाम करण्याचे षडयंत्र थांबवा, वस्तूस्थिती समजून न घेता खोट्या आरोपाची चिखलफेक करू नका असे आवाहन कामशेतच्या महावीर हाॅस्पिटलचे डाॅ.विकेश मुथा यांनी केले आहे.
मागील आठ दिवसांपासून महावीर हाॅस्पिटलवर वेगवेगळ्या आरोपाची बरसात होत आहे,विशेषतः डाॅक्टर विकेश मुथांवर हाॅस्पिटलच्या बिला बाबत आरोप केले आहेत,या सगळ्या आरोपांचे डाॅक्टर मुथा यांनी खंडन केले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून कामशेत पंचक्रोशीतील सर्वसामान्य रूग्णांच्या सेवेसाठी महावीर हाॅस्पिटल काम करीत आहे.
या पंचक्रोशीतील कित्येक गोरगरीब रूग्णांवर मोफत
उपचार केले जात आहे,दवाखान्यात अँबुलन्स बेडवर लोटून आलेले कित्येक रूग्ण घरी जाताना स्वतःच्या पायाने चालत गेले,याकडे लक्ष वेधून डाॅक्टरने आरोप करणाऱ्यांवर खडबोल सुचवले आहे. सध्या कोरोनाच्या महाभयंकर लढाईत वादावादाचे आणि बाचाबाचीचे दिवस नाही,प्रत्येकाने हात हात घालून काम करण्याचे दिवस आहे.
सगळ्या दवाखान्यात ऑक्सीजन,रेमडेसीव्हीर,व्हेंटिलेटर,प्लाझ्मा यांचा तुटवडा आहे,दवाखान्यावर चिखलफेक करून डाॅकटराचे मनोबल खच्ची करण्यापेक्षा या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला तर ऐकामेकीच्या हातात हात घालून पुढे जाता येईल असा सबुरीचा सल्ला डाॅक्टरांनी दिला. डाॅक्टर म्हटले ज्या,रूग्णांच्या बिला वरून इतका आकडतांडव केला जातो,त्या रुग्णाला तालुक्यातील खाजगी किंवा सरकारी दवाखान्यात बेड मिळत नव्हता.
त्याच्या नातेवाईकांनी चौकशी करून दवाखान्यात दाखल करून घ्या अशी विनंती केली तेव्हा ही वस्तूस्थिती त्याना सांगितली होती.
सबंधित रुग्णाच्या आजारपणाची कल्पना दिली होती,उपचाराच्या सर्व पद्धती वापरून,गरजेच्या नुसार आवश्यक औषधे वापरून रूग्णाला बरे केले. अँबुलन्स मध्ये झोपून बेडवर उचलून आणलेले हे पेशंट जाताना स्वतःच्या पायाने चालत गेले ती आमच्या साठी आनंदाची बाब आहे.गोळया औषधांचा खर्च वगळून दवाखान्याच्या उपचाराचे बिल सबंधित नातेवाईकांना दिले आहे,खासदार श्रीरंग बारणे यांच्या शब्दाला मान देत बिला मध्ये सवलत देण्यात आली आहे.
ज्यानी हाॅस्पिटलवर टीका केली ती वैयक्तिक द्वेषातून केली असावी,आम्ही सरकारच्या सगळया नियमाचे पालन करीत,शासनाने दिलेल्या सूचनांचा आदर करतो आणि त्याच पद्धतीने हाॅस्पिटल चालवतो. आता होत असलेले आरोप कशासाठी हे काही सांगता येत नाही.
ग्रामपंचायतीने स्थानिक रूग्णांच्या उपचारांसाठी दोन राखीव बेड ठेवण्याच्या सूचना दिल्या आम्ही याही सुचनेचा आदर करून दोन बेड राखीव ठेवले आहेत.
माझ्या शहरातील माणूस होम आयसोलेशन करून ठणठणीत बरा व्हावा यासाठी त्याला योग्य उपचार आणि समुपदेशन करीत आहेत.
माझ्या हाॅस्पिटल वर केलेली टीका ही राजकीय सुड बुद्धीने असले तर ही राजकारण करण्याची जागा नसल्याचे मुथा यांनी सांगितले.

