सुखी संसाराची रेश्मगाठ ‘
संसाराचा रहाटगाडा सुख दु:खाच्या अनेक हिंदोळ्यावर झुलत असतो.आज त्यांच्या संसाराच्या रेशीमगाठीला अठरा वर्षे झाली. या अठरा वर्षातील जीवनप्रवास त्यांनी अनेक कौटुंबिक स्थितंरे पाहिली.पण ते दोघेही डगमगले नाही.दिलेली प्रत्येक जबाबदारी नेटाने पार स्वीकारली.त्यांची तीन पिढ्यांचं सोयरीक त्या गावात आहे. तिन्हीही पिढ्यांची सोयरीक तितकीच आदराने ते जपत आहे.
आज तर त्यांची लेक निगडे गावची प्रथम लोकनियुक्त सरपंच आहे. त्यामुळे माहेरी लेकीचा मानसन्मान वाढलेला आहेच. या लेकीचे माहेर साते, साते गावातील गावडे परिवारातील ही कन्या निगडेतील बबूशा भांगरे यांच्याशी विवाहबद्ध झाली. जेव्हा भांगरे कौटुंबिक मुंबई शहरात व्यवसाय करीत होते.
साते गावातील भुंडे,त्या पाठोपाठ आगळमे आणि त्या नंतर गावडे अशी तीन घराण्यांतील तीन पिढ्यांची सोयरीक भांगरे कुटुंबाशी जोडली गेली. बबूशा भांगरे आणि त्यांच्या परिवाराचा मुंबई शहरात फुले,हार आणि सजावटीचा व्यवसाय.निगडेत त्यांचे येणे जाणे सण समारंभ,यात्रा,लग्न,दशक्रिया सारख्या सुख दु:खाच्या प्रसंगातच.
ऐरवी ते भले आणि त्यांचे काम भले, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने त्यांना कष्ट शिकवले. सरळ मार्गाने जाण्याचा रस्ता शिकवला. तोच रस्ता धरून हे दोघे निघाले.संसाराचा रथ पुढे चालला होता.अनेक आशा आकांक्षा आणि स्वप्नाला बळ मिळत होते. दिवसामागून दिवस चालले होते. शासनाने महिला आरक्षण दिले होतेच,त्या पाठोपाठ नगराध्यक्ष,सरपंच या पदाच्या निवडणुका जनतेतून करण्याचा शासनस्तरावर झाला.
गावातील भावकी,गावकी आणि मित्र मंडळीनी बबूशा भांगरे यांची पत्नी सविता भांगरे यांना ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत उभे करून निवडून आणलं. सविता बबूशा भांगरे प्रथम लोकनियुक्त सरपंच अशी बिरुदावली त्यांच्या नावावर आली.भांगरे परिवाराचे मुंबई सोडली आणि ते निगडेला आले. शासनाने आरक्षण दिले,या पदावर महिला सरपंच विराजमान आहेत सविता ताई या पदाला न्याय देत आहेत.
ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक व वैयक्तिक विकास कामांवर त्यांचा भर आहे. वडीलधा-यांचे आशीर्वाद,महिलांचे कुशल संघटन आणि तरूणाच्या सूचनांचा आदर करीत त्या गावचा उत्तम कारभार करीत आहेत.
महिला ही अबाला नसून सबला असल्याचा नारा सगळे देतात,पण ती ज्या पदावर आहे .त्या पदाचा आणि तिचा मानसन्मान राखून तिला प्रोत्साहन देणारे बबूशा भांगरे यांच्या सारखे विरळच. आजही महिला आरक्षणाने अनेक महिला भगिनींना सरपंच,उपसरपंच,सदस्य,पोलीस पाटील पदावर काम करण्याची संधी मिळाली,पण तिचा हा अधिकार डावला जातो. तिचा हक्क कधी नवरा,कधी मुलगा हिरवून घेतो. तस होऊ नये अशी दबक्या आवाजात बोललही जात पण प्रत्यक्षात तस होत नाही.आज कोरोनाच्या संकटात सगळे आपापल्या परीने काम करीत आहेत. त्यात सविता ताई यांचाही हिरीरीने सहभाग आहे.
गावातील आरोग्य सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, गावातील आरोग्य उपकेंद्रात पंचक्रोशीतील नागरिकांना लसीकरण करता यावे यासाठी त्या पाठपुरावा करीत आहेत.
आज आपल्या गावच्या सरपंचांच्या लग्नाची Anniversary म्हणून गावातील सगळ्यांच्या स्टेटस वर सरपंचांना शुभेच्छा देणारे पोस्ट दिसले .सरपंच सविता ताई भांगरे आणि बबूशा भांगरे यांना लग्नाच्या शुभेच्छा देताना,स्त्री पुरूष समानतेचा धागा बरोबरीचा असतो हे जाणवले,आणि चार ओळी लिहण्याचा सुचले. लिहिण्याचा मोहही आवरला नाही.आपसूक चार ओळी लिहिल्या.
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले…लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले…आनंदाने नांदो संसार तुमचा.. आजच्या दिवशी याच शुभेच्छा..

error: Content is protected !!