
पुणे:
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटातील पत्रकार किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोना संसर्गाची बाधा झाल्यास जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालय ( विप्रो), हिंजवडी , फेस २ ,ता. मुळशी येथे त्यांच्यावर उपचाराची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे .
या अनुषंगाने प्रसाद यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पुणे जिल्हयामध्ये कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविणेसाठी जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना
केल्या जात आहेत. त्याअनुषंगाने वार्तांकन करत असताना पत्रकाराना अथवा त्यांचे कुटुंबीयांना कोविड बाधा होण्याची शक्यता आहे.
त्यामळे त्यांचेवर वेळेवर उपचार होण्याच्या दृष्टीने, आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सोई- सुविधा त्वरीत उपलब्ध करुन देणेच्या दृष्टीने जिल्हा परिषद कोविड रुग्णालय ( विप्रो), हिंजवडी , फेस II ,
ता. मुळशी येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पत्रकार किंवा कुटुंबीयांना जर कोविड संसर्गजन्य आजाराची लक्षणे ताप, सर्दी ,खोकला, अंग दुखणे , अशक्त पणा येणे, चव जाणे व सुगंध न येणे आढळून आल्यास चाचणी करुन चाचणी मध्ये कोविडची लागण झालेचे निदर्शनास आल्यास त्वरीत जिल्हा परिषद कोविड रुग्णालय ( विप्रो),हिंजवडी, फेस II , ता. मुळशी येथील 24 X 7 चालू फोन नंबर ( 8956704750 ) येथे संपर्क साधावा.
जेणेकरुन वेळेत कोविड संसर्गजन्य आजारावर उपचार घेऊन लवकरात – लवकर मात करता येईल. उपरोक्त
सुविधेसाठी काही मदत आवश्यक असल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांकावर (020-26134313)
श्री.किशोर कुलकर्णी (9689131370) यांचेशी संपर्क साधावा जेणे करुन या कामी रुग्णालयीन सेवेसाठी त्यांची मदत होईल.

