अतूल राऊत च्या पुढाकाराने पाचव्या मिनिटात झाली प्लाझ्माची सोय वडगाव मावळ:
प्लाझ्मा हवा..
पेशंट चे नाव..
दवाखान्याचे नाव व पत्ता…
वार्ड नंबर व नाव – ICU
संपर्क क्रमांक….
रक्त गट – O+ (O positive)
अँडमिशन ची तारीख…
कोविड रेपोर्ट ची तारीख..
सध्याची आँक्सीजन लेवल..
HRCT score ..
वय ..
हा मेसेज व्हटसअप वर आला,पेशंटचे नाव वाचल आणि मनात भीतीचे काहूर उठलं.अरे हा तर आपला शेजारी,रोज जाता येता यांना हायबाय करतो. विचारपूस करून पुढे जातो. यांना प्लाझ्माची गरज आहे. काय कराव,कोणाला फोन कराव.. असा मनात विचार आला आणि नाव सुचल.
अरे आपला अतूल आहे ना,व्हटसअप अप आलेला मेसेज क्षणात अतूल राऊतला फाॅरवड केला.
आणि फोन केला,पहिल्याच रिंग मध्ये फोन उचला,सर तुमचा मेसेज वाचला,पाच मिनिट वेळ द्या. चौथ्या मिनिटात अतूलचा बॅक काॅल आला. सर प्लाझ्मा मिळाला. लोकेशन पाठवतो.कोरोना बाधीत रूग्णांच्या नातेवाईकाला जाऊन प्लाझ्मा आणायला पाठवा .
आज सोमवारी दि.१० मेला दुपारी दीडच्या वाजण्याच्या सुमारास फोन वर झालेले अतूल राऊतच आणि माझे संभाषण. आणि अडीच वाजता कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांच्या नातेवाईक पिंपरी तून प्लाझ्मा घेऊन तळेगावात दाखल. डाॅक्टरांनी गरजेनुसार संबंधित रूग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार केला.
एका व्हटसअप च्या मेसेज वर एका साध्या फोनवर अतुलने पिंपरीतून प्लाझ्मा उपलब्ध करून दिला.कितीही तत्परता.
हा अनुभव मी घेतला ,रूग्णांच्या नातेवाईकांच्या हातात प्लाझ्मा मिळाला,त्याच क्षणी अतूलचा फोन सर प्लाझ्मा नातेवाईकांच्या हातात मिळाला. कितीही हा बारकावा. कोणत्या क्षणी कोणत्या कामाला महत्व द्यायचे हे आजच्या घटनेने अतूलने शिकवले. आता या क्षणी प्लाझ्मा मिळवून द्यायचा या एका ध्यासापोटी अतूलने केलेले काम फार मोलाचे ठरणार आहे.
आजचा हा अनुभव घेतलेला मी एकटा नाही,असा अनुभव कित्येकांनी घेतला असा,आपला अतूल राऊत नाही का? त्याने आणि त्याच्या सहका-यांनी कोरोनाच्या या सेवेत वाहून घेतले आहे.सोशल मिडियाचा इतका सुंदर आणि नेटका,नेमका वापर करता येतो याचा त्याच्या टीमने आदर्श घालून दिला.
कोणत्याही प्रसिद्धीची आस नाही की,कौतुकाची अपेक्षा नाही. माझ्या जनसंपर्काचा,माझा ज्ञानाचा समाजाला उपयोग होईल या ध्यासाने काम करणा-या अतूल टीमचे अभिनंदन..’मावळचे कोरोना योद्धे ‘ या नावाने सुरू केलेल्या व्हटसअप ग्रुपवरून आज पर्यत अनेकांना मदत पोहचली आहे. या टीमच्या मदतीला परमेश्वराने सतत पाठबळ द्यावे ऐवढेच या निमित्ताने म्हणता येईल.
कोरोनाच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबवल्या जात आहे,डाॅक्टर,नर्स,आरोग्य सेवक,सेविका,कर्मचारी,पोलीस प्रशासन,अंगणवाडी सेविका,मदतनीस,शिक्षक,सरकारी कर्मचारी,प्रशासनातील सगळी मंडळी राबत आहेत.
अनेक सेवाभावी संस्था,संघटना मदतीचा हात पुढे करीत आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्ते आपल्या परीने मदतसाठी तत्पर आहे.
सोशल मीडियातून महाराष्ट्र भर नेटवर्क उभारलेल्या टीम मावळचे कोरोना योद्धे या टीमचे आणि टीमचा लिडर अतूल यांचेही काम वाखण्या सारखे आहे. अतूलच्या सामाजिक कार्याचा मित्र म्हणून फार स्वाभिमान आहे. अतूल मित्रा,keep it up.

error: Content is protected !!