
वडगाव मावळ :
मावळ तालुक्यातील सांगावडे गावात बिबटया ची दहशत मागील दीड महिन्यापासू सुरु होती. त्या बिबट्याला वनविभागाने रविवारी (दि.९) सकाळी ६ वाजता. पकडण्यात आले आहे.
मागील वर्षी सांगावडे व दारुंब्रे गावात प्रत्येकी दोन असे चार बिबट्याचे पिल्ले सापडले होते. ते परत सोडण्यात आले. तर रविवारी (दि.९) मादी बिबट्याला पिंजरा लावून पकडण्यात आले आहे.
वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगावडे गावच्या हद्दीत मागील दीड महिन्यापासून मादी बिबट्याचा वावर होता. अनेक शेतकरी व ग्रामस्थांनी बिबट्याला बघितल्याचे वनविभागाला सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि.७) रोजी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला तसेच त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला होता. रविवारी पहाटे २ वाजता पिंजऱ्याजवळ बिबटया आला होता. सकाळी ६ वा. पिंजऱ्यात बंद झाला असुन. त्याला राजीव गांधी प्राणिसंग्रहालय कात्रज पुणे येथे आरोग्य तपासणी करुन ठेवण्यात आले आहे.
या परिसरात आणखी बिबटे असण्याचा अंदाज असुन कोणाला दिसल्यास वनविभागाला कळविण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन्यजीव रक्षक मावळ संस्थाचे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, गणेश निसाळ, गणेश ढोरे, प्रथमेश मुंगीकर, निनाद काकडे ,भास्कर माळी, गणेश गायकवाड, रोहित दाभाडे , जीगर सोलंकी , व इतर काही सर्पमित्र, प्राणीमित्र वनाधिकारी उपस्थित होते.

