वडगाव मावळ : 
हरवलेल्या तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची घटना रविवारी (दि.९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आंदर मावळातील इंगळुन किवळे गावच्या  हद्दीतील वनक्षेत्रात तरूणाचा मृतदेह सापडला. चार महिन्या पूर्वी याच लग्न झाले होते.
विजय खंडू हेमाडे (वय २४ रा. वडेश्वर-किवळे ता.मावळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ,”ज्ञानेश्वर मदगे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात खबर दिली. मयत विजय हेमाडे हा गुरुवारी (दि.६) घरातून काही न सांगता निघून गेला होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला पण कोठेही सापडला नसल्याने त्याच्या हरवल्याची तक्रार वडगाव पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.८) दाखल केली होती. 
रविवारी दुपारी १:३० वा. इंगळुन-किवळे हद्दीतील वनक्षेत्रातील एका झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळुन आला आहे.
घटनास्थळी सहाय्यक फौजदार भाऊसाहेब कर्डीले व कर्मचारी अंकुश पाटील यांनी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. वामन गेंगजे यांनी केले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक दिलीप सुपे करत आहेत.

error: Content is protected !!