आत्महत्याग्रस्त तरुण शिवसेनेचा माजी पदाधिकारी तळेगाव दाभाडे :
येथील भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयातील कोविड आयसीयू वाॅर्डात उपचार घेणा-या कोरोना बाधीत रुग्णाने स्टोअर रूममध्ये वायरच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ते कार्ला शिवसेना शाखेचे माजी प्रमुख होते.
रविवार (दि. ९)  सकाळी ७:३० वाजण्याच्या पूर्वी आत्महत्येची ही घडली.या शनिवारी (दि.१) रोजी  गणेश लोके वय ४० रा. मळवली ता. मावळ यांचा कोरोनाने मृत्यु झाला होता,ही घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडली.लोके यांच्या नातेवाईकांकडे वैद्यकीय उपचाराचे बिल भरण्यासठीक  ५९,००० रुपये  नसल्याने तीन दिवस मृतदेह शितगृहात ठेवण्याचा प्रकार घडला होता.
रविवारी (दि.९) सकाळी ७:३० पूर्वी हुलावळे यांच्या आत्महत्या केल्याच्या घटनेने मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.सोमनाथ तुकाराम हुलावळे (वय ४४ रा. कार्ला ता. मावळ) असे आत्महत्या केलेल्या कोरोना रुग्णाचे नाव आहे. या प्रकरणी फिर्याद दिनेश हनुमंत हुलावळे (वय ३३) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ हुलावळे यांच्यावर  शनिवारी (दि.१) रोजी  जनरल हॉस्पिटलमध्ये कोविड आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.अचानक रविवारी (दि.९) सकाळी ७:३० वाजण्याच्या पूर्वी  टेलिफोन केबलच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, कर्मचारी बाबराजे मुंडे, स्वप्नील चांदेकर आदींनी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.वामन गेंगजे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. अंत्यसंस्कार बनेश्वर स्मशानभूमी त करण्यात आले.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर करत आहेत.
दिनेश हुलावळे यांनी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळे आमच्या रुग्णांचा मृत्यु झाला. आमच्या मृत रुग्णाचे बिल न घेता, मृतदेह दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आयसीयूमध्ये असलेला रुग्ण आत्महत्या करतो हॉस्पिटल व्यवस्थापन झोपलेलं आहे का ? तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये  सुरु असलेल्या गलथान कारभाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आणखी किती रुग्णांचा बळी गेल्यावर या रूग्णालयावर कारवाई होणार. कधी वचक बसणार असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

error: Content is protected !!