●सॅनिटाझर्सचा वापर करणे किंवा साबणाने स्वच्छ हात धुणे अधिक गरजेचे आहे. ज्यामुळे अस्वच्छ हातांमधून पसरणाऱ्या विषाणूचा नाश करणे शक्य होते.
● खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल अथवा टिश्यु पेपर धरावा. पुन्हा पुन्हा तोच टिश्यु पेपर न वापरता एकदा वापर झाल्यानंतर त्वरीत तो कचराकुंडीत टाकून द्यावा.
●समोरच्या व्यक्तीशी बोलताना कमीतकमी तीन फूट अंतर राखावे. विशेषत: आजारी असलेल्यांनी इतर व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळावे असे केल्याने मुलांना संसर्ग होण्यापासून रोखता येईल.
●अस्वच्छ हातांनी आपले डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका, जर आपण वारंवार स्पर्श केला तर विषाणु संसर्गाचा धोका अधिक वाढतो.
●जर तुमच्या मुलांना ताप, खोकला तसेच श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांशी सल्लामसलत करुन त्यातील लक्षणांविषयी माहिती द्या. वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या व उपचारास विलंब करू नका.
●आपल्या मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक चूकवू नका. जर एखादा डोस घण्यात विलंब होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रलंबित डोस लवकरात लवकर घेण्यात यावा.
● निरोगी आतडे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. दही सारख्या पदार्थात प्रोबायोटिक्स भरपूर असतात जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. मुलांना सतत एकाच जागी बसवून न ठेवता त्यांच्या शारीरीक हालचाली वाढवून त्यांना सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहित करा आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्याविषयी मुलांना सूचना द्या.
●कच्चे अथवा अर्धवट शिजविलेल्या मांसाचे सेवन करणे टाळा.
●स्वत: च्या मर्जीने औषधे घेण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या

error: Content is protected !!