वडगांव मावळ:
माझं कुटुंब, माझी जबाबदारी अंतर्गत निगडे येथे ग्रामपंचायती तर्फे सर्वेक्षण करण्यात आले. निगडे ग्रामपंचायत हद्दीतील 256 कुटुंबातील 1390 नागरिकांची तपासणी करण्यात आली
यावेळी सरपंच सौ. सविताताई बबूशा भांगरे, उपसरपंच रामदास चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गणेश भांगरे, भाऊ थरकूडे, पोलिस पाटील संतोष भागवत, ग्रामसेवक जाधव भाऊसाहेब उपस्थित होते.
सर्वेक्षण करण्यासाठी आशा सेविका, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी थर्मल गण, ऑक्सिजन मीटर द्वारे ग्रामस्थांचे tempreture आणि ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यात आली.
सरपंच सौ. सविताताई भांगरे यांनी ग्रामस्थांना मास्क वापरणे, सॅनिटायझेर वापरण्याचे तसेच सोशिअल डिस्टन्स चे आवाहन केले. तसेच नाकरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभारही मानले.

error: Content is protected !!