कान्हे:
राज्यासह मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होतं आहे त्याच पार्श्वभूमी राज्य सरकारने काही निर्बंध लावत लॉकडाऊन जाहिर केले आहे.लॉकडाऊनमुळे अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
तर गोरगरिबांचे कंबरडे मोडले असताना कान्हे येथील युवकाने गोरगरीबांन साठी यांनी १ मे ते १५ मे पर्यंत मोफत भोजनाची व्यवस्था सतिश सातकर मंचच्या वतिने सतीश सातकर,योगेश सातकर,विजय सातकर,निलेश खेंगले,सुरज सातकर,तुषार सातकर,विकास लालगुडे,अनिकेत ठाकर,प्रत्युश पांडा तसेच कान्हे ग्रामस्थांनच्या वतिने करण्यात आली आहे.
सतिश सातकर म्हणाले,”
सध्या शहरी आणि ग्रामीण भाग कोरोना सारख्या संर्सगाने व्यापला आहे.या.संर्सगाला पायाबंद घालण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न राज्य सरकार व केंद्र सरकार तसेच सामाजिक संस्था डॉक्टर्स , नर्स , पोलिस कर्मचारी व आनेक प्राकरचे सामाजिक घटक ,जीवाची बाजी लावून काम करत आहेत.
या पार्श्वभुमीवर आपणही समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने गोरगरिब जनतेसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करावी त्यामुळे मी हा एक उपक्रम हाती घेतला आहे. तरी सर्व गोरगरिब जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन करतो.

error: Content is protected !!