तळेगाव दाभाडे: राष्ट्र आहे संकटात म्हणुन मी सहभागी होतोय रक्तदान शिबिरातअवघ्या ४ तासांत १७७ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. मावळातील विविध संस्थांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात राबविले .या भव्य रक्तदान शिबिरात १७७ जणांनी रक्तदान केले.
सध्या व्हाॅस्पीटलमध्ये भासत असलेला रक्ताचा तुटवडा जाणून घेऊन तसेच १ मे नंतर कोरोणा प्रतिबंधक लसीकरण झाल्यानंतर किमान १ ते दीड महिना रक्तदान करता येणार नाही परिणामी या काळात हाॅस्पीटल मध्ये रक्ताची कमतरता भासु नये म्हणून मावळातील विविध संस्था रक्तदानासाठी पुढे सरसावल्या आहेत…
१ मे कामगार दिनाचे व संभाजी महाराज जयंतीनिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभाग, जायंटस ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे आणि वारकरी सेवा फाउंडेशन तसेच वन्यजीव रक्षक मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबीरात १७७ रक्तदात्यांनी रक्तदान करून बजावले कर्तव्य. दिप्रज्वलन करून वारकरी सेवा फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष हभप पांडूरंग महाराज शितोळे आणि सरसेनापती दाभाडे घरण्याचे वंशज सत्येद्रराजे दाभाडे सरकार व सौ. याज्ञीसेनीराज दाभाडे सरकार यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करून रक्तदान शिबिरास सुरवात करण्यात आली, तसेच वारकरी सेवा फाउंडेशनचे हभप संजय हिवराळे महाराज आणि उद्योजक संतोषजी परदेशी तसेच फाॅरेस्ट अधिकारी वाघमारे मॅडम, पोलिस अधिकारी वाबळे साहेब, बाबाराजे मुंडे यांनी देखील उपस्थिती लावली. मावळ तालुक्यातील कानाकोपऱ्यातुन तरूणांनी तसेच महिलांनी अधिक संख्येने येऊन उस्फुर्त आणि स्वयमस्फुर्तीने कुठल्याही गिप्ट ची अपेक्षा न करता कर्तव्य बजावले.
प्रत्येक रक्तदात्यास सॉनिटायझर व N 95 मास्क भेट देण्यात आले. आज झालेल्या रक्तदान शिबिरास मावळवासीयांनी भरघोस प्रतिसाद दिला, कोरोनाचे नियम पाळून सुसज्ज अश्या सुशील मंगल गार्डन मध्ये हा उपक्रम सकाळी 10 ते 3 या कालावधी मध्ये पार पाडण्यात आला कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील राष्ट्रसेवेसाठी आपले रक्त कोणाचाही जीव वाचवण्याच्या कामी यावे या एका हेतूने सर्व जण उपस्थित होते त्यांचे संस्थेच्या वतीने दत्तामामा कुंजीर आणि आभार मानले. तसेच सहयाद्री प्रतिष्ठान मार्फत कोरोणा कालावधी मध्ये सर्वांच्या सोयी साठी एक HELPLINE सुरू करण्यात येणार आहे प्लाझमा, ब्लड, आणि बेड उपलढ करून देण्यासाठी एक नियोजन समिती बनवून ती 2 दिवसात कार्यन्वित करण्यत येईल..

error: Content is protected !!