टाकवे बुद्रुक :
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंतर्गत बुधवारी (दि. ५ )मे ला निगडे येथे सर्वेक्षण करण्यात येणार आहे,नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे  असे आवाहन सरपंच सविता बबूशा भांगरे यांनी केले.   
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या पाहता निगडे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांचे पल्स आक्सिमीटरव्दारे तपासणी केली जाणार आहे.         
   या तपासणी करीता शिक्षक,आशा सेविका अंगडवाडी सेविका यांच्या मदतीने तपासणी करण्यात येणार आहे.
नागरिकांनी तपासणी दरम्यान योग्य माहिती देऊन कुटुंबातील सर्वानी आपली तपासणी करुन घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच सविता भांगरे यांनी गावातील नागरिकांना केले आहे.

error: Content is protected !!