इंदोरी:
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’अंतर्गत जांबवडे ग्रामपंचायतीतील ११० कुटुंबाचं सर्वेक्षण करण्यात आले. ५२५ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.त्यापैकी ४६ व्यक्ती संशयित म्हणून आढळून आल्या.या व्यक्तींची नावे ग्रामपंचायतीकडून आरोग्य विभागास कळविण्यात आली.
आरोग्य विभाग कडून कुठलीही दिरंगाई न करता तात्काळ संशयित व्यक्तीं ची अँटीजेन टेस्ट करण्यात आली . यामध्ये सात जण पॉझिटिव्ह आढळल्या. प्रशासनाने तात्काळ कार्यवाही केली,कोरोना बाधीतांवर उपचारासाठी पाठविण्यात आले.
या कामी योग्य निर्णय व मोलाचे सहकार्य सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सामाजिक कार्यकर्ते , शिक्षक यांचे लाभले.
डाॅ.मोनिका निलेश भेगडे (समुदाय आरोग्य अधिकारी), जयश्री लोहकरे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), मंदाकिनी बाबुराव दिवार (आरोग्यसेविका), वैभव कोंडीबा आखाडे (आरोग्य सेवक) यांच्या पथकाने तपासणी केली.

error: Content is protected !!