वडगाव मावळ:
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सागर येवले मित्र परिवाराच्या वतीने मावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.
चिखलसे, कामशेत, अहिरवडे, कान्हे ,जांभूळ, सांगवी, कुसगांव , साते या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर ,मास्क वाटप करण्यात आले.
सरपंच विजय सातकर म्हणाले, कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे. शासनाचे सर्व अधिकारी-कर्मचारी जीवाची परवा न करता काम करत असतात. त्याच प्रमाणे ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचे कर्मचारी स्वच्छता व नागरिकांची काळजी घेत असतात .या पार्श्वभूमीवर हा स्तुती पूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे .
सरपंच विजयर सातकर, चिखलसे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील काजळे , कामशेत ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य दत्ता शिंदे, विजय दौडे ,जांभूळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच एकनाथ गाडे , साते ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष शिंदे ,उपसरपंच आशा सातकर , महेश सातकर ,अंकुश काकरे , ग्रामपंचायत सदस्य योगेश काकरे , ऋषीना थ आगळमे ,समीर सातकर ,अंकुश चोपडे, बाबाजी चोपडे,
चंद्रकांत ओव्हाळ , आरिफ मुलाणी , संदीप ओव्हाळ तसेच सागर भाऊ येवले मित्र परिवाराचे मा उपसरपंच सागर येवले, कामशेत ग्रामपंचायत सदस्य दत्ता भाऊ शिंदे, मा उपसरपंच कुणाल ओव्हाळ , निहाल दौडे , वैभव शिंदे, मयुर चोपडे, शुभम गावडे, योगेश शिंदे उपस्थित होते. प्रस्ताविक कुणाल ओव्हाळ यांनी केले. आभार प्रदर्शन दत्ता भाऊ शिंदे यांनी केले.

error: Content is protected !!