तळेगाव दाभाडे:
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे पुतणे युवा नेते केदार भेगडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रमाला प्राधान्य दिले आहे.
केदार भेगडे युवा मंच व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने तळेगाव येथील कोविड हॉस्पिटला मोफत १०० जंबो ऑक्सिजन सिलेंडर भेट दिले आहे.
केदार भेगडे यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.
सध्या राज्यात कोरोनाची भयंकर अशी परस्थिती असून अश्या जागतिक महामारीत असंख्य रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन तळेगाव येथील कोविड रुग्णालयांना मोफत १०० जंबो सिलेंडर भेट देण्यात आले.
मावळ तालुक्यातील ज्या रुग्णालयांना ऑक्सिजनची गरज भासत असेल त्यांनी मोकळे सिलेंडर जर आमच्या पर्यंत दिली तर केदार भेगडे युवा मंचच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर भरून देण्यात येतील अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
माजी मंत्री बाळा भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे,उपनगराध्यक्ष सुशीलभाऊ सैंदाणे,.चंद्रकांत शेटे,नगरसेवक संतोष दाभाडे,नगरसेविका शोभा भेगडे,सुनिल भेगडे,विनोद भेगडे,युवा अध्यक्ष अक्षय भेगडे, सरचिटणीस रवी साबळे विनायक गंगाराम भेगडे,प्रदीप गटे,आशुतोष हेंद्रे उपस्थित होते.

error: Content is protected !!