
देहू:
श्री क्षेत्र देहुगाव आणि परिसरातील रुग्णांना तातडीने उपचार सुविधा मिळाव्यात यासाठी अद्ययावत रुग्णवाहिका देहूकरांच्या सेवेत लोकार्पणाने देण्यात आली.
श्री क्षेत्र देहू परिसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आरोग्य सेवेत अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळणे शक्य होणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
अशा संकटसमयी आरोग्य सुविधा सक्षम करणे गरजेचे आहे.यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, देहु शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, माजी सभापती हेमलता काळोखे, रायगड राष्ट्रवादी निरीक्षक ॲड.रुपाली दाभाडे, सरपंच पुनम काळोखे, वैद्यकीय अधिकारी डॉ.यादव, मा.सरपंच सुनिता टिळेकर,
अध्यक्ष श्री संत तुकाराम महाराज संस्थान हभप नितीन महाराज मोरे, विश्वस्त हभप माणिक महाराज मोरे, हभप संजय महाराज मोरे, हभप विशाल महाराज मोरे, शिवसेना ज्येष्ठ नेते रमेश हगवणे, शिवसेना शहराध्यक्ष सुनिल हगवणे, देहूरोड महिला अध्यक्षा शितल हगवणे, महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष देहु वैशाली टिळेकर, हभप जालिंदर महाराज काळोखे ,कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया देहू निखिल चव्हाण आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

