तळेगाव दाभाडे: सध्या सगळीकडेच कोरोना या आजाराचा प्रचंड प्रादुर्भाव आहे…हा संसर्गजन्य आजार असल्याने सध्या लाँकडाऊन असले तरीही रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे…कुठेही चौकशी केली तरी बेड मिळणे मुश्किल झाले आहे…आँक्सिजन व रेमडीसिव्हीर इंजेक्शन यांची तर कमतरताच आहे…अशा या संकटमय काळात परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.तानाजी महाळुंगकर यांनी आपल्या लेकीचा वाढदिवस ‘कोवीड सेंटरला मदत’ देऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला…खेड तालुक्यातील महाळूंगे येथील कु.साईशा हिच्या जन्मदिनानिमित्त महाळुंगकर परिवाराने महाळुंगे येथील कोवीड सेंटरला विविध प्रकारचे सुमारे पाच हजार रुपयाचे साहित्य सुपूर्त केले…सध्या राज्य संकटात असताना मुख्यमंत्री साहायत्ता निधी अथवा कोवीड सेंटर यांना मदत करणे गरजेचे आहे..शासकीय कोवीड सेंटरमध्ये अनेक रुग्णांवर उपचार केले जात असून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने ही मदत केली असल्याचे श्री.तानाजी महाळूंकर यांनी सांगितले…समाजातील दानशूर व्यक्तींनी कोवीड सेंटरला विविध प्रकारची मदत करुन सेवाभाव जपावा,असे आवाहन अँड.समीर महाळुंगकर यांनी केले…लेकीच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून कोवीड सेंटरला मदत करण्याच्या महाळूंगकर परिवाराच्या निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत आहे…

error: Content is protected !!