वडगाव मावळ:
योगा, सूर्यनमस्कार आणि एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यान अशा शारीरिक आणि मानसिक विकासाच्या त्रिसूत्रीचा विकास घडविण्यासाठी आणि या त्रिसूत्रीची आवड निर्माण करण्यासाठी गावपातळीवर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे,गावातील सर्व विद्यार्थ्यानी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कशाळ – किवळे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच तुळशीराम पोपट जाधव यांनी केले आहे.
या स्पर्धेच्या अनुषंगाने गावातील सर्वाच्या सूचनांचा आदर करण्यात येणार आहे,यासाठी सूचना द्याव्यात अशी अपेक्षा जाधव यांनी केली आहे. गावपातळीवर विधायक उपक्रमाची निर्मिती करून ती प्रत्यक्षात आणण्याकडे तुळशीराम जाधव यांचा कल असतो.याच धर्तीवर या उपक्रमाचे त्यांनी आयोजन केले आहे.
या बाबत अधिक माहिती देताना तुळशीराम जाधव म्हणाले,”
या वर्षी शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने गेले. मुलांना उन्हाळी सुट्टी पण लागली. शाळेचा उंबरठा पण न ओलांडता मुले पुढच्या वर्गात गेली.
याच विद्यार्थ्यांकरिता आपण योगा, सूर्यनमस्कार आणि एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यान अशा शारीरिक आणि मानसिक विकासाच्या त्रिसूत्रीचा विकास घडविण्यासाठी आणि या त्रिसूत्रीची आवड निर्माण करण्यासाठी स्पर्धा घेणार आहोत.
पुढील महिन्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून आपण या स्पर्धांचे आयोजन करणार आहोत.
स्पर्धेमध्ये अनुक्रमे तीन क्रमांक काढण्यात येतील.
प्रत्येक विजेत्या स्पर्धकांना रोख स्वरूपात पारितोषिक व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात येईल.
स्पर्धा ऑनलाईन अथवा ऑफलाईन घेण्यात येतील.
स्पर्धेत परीक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय योगा प्रशिक्षक डॉ. दयानंद राजे हे काम पाहतील.
सर्वोत्कृष्ट स्पर्धकांचे व्हिडिओ पंतप्रधान कार्यालय ( योग अनुसंस्थान विभाग ) यांच्याकडे पाठविण्यात येईल.
मुलांना योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, ध्यान यांची आवड निर्माण व्हावी, हा या स्पर्धेमधील मुख्य उद्देश आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत ” एक तास व्यायामासाठी ” हा संकल्प करून मुलांना या वयापासूनच व्यायामाची रुची निर्माण करणे हा हेतू आहे.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात येईल. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कशाळ आणि अंगणवाडीत शिकणारा विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतो.
स्पर्धेच्या नियोजनाची नियमावली वेळच्या वेळी जाहीर करण्यात येईल. गावातील ग्रामस्थ आणि तरुण वर्गाच्या सूचना स्वागतार्ह आहेत. आपल्या सूचनांचा आदर करण्यात येईल असेही जाधव म्हणाले.

error: Content is protected !!