
कामशेत:
मावळ तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील बायाबापडे दवाखान्यात उपचारासाठी कामशेतच्या दवाखान्यात येतात,इंजेक्शन मारून झाल्यावर,गोळया,औषधे घेतल्यावर डाॅक्टरला बिल दिले की,डाॅक्टरच पेशंटला विचारणार,घरी जायला हाशिलाला पैसे आहेत का? आणि बिलातील काही पैसै त्या रुग्णाला परत देणार.
अशा सेवाभावी वृत्तीने काम करणारे डाॅक्टर विरळच,या डाॅक्टरचे नाव आहे,डाॅ.विकेश मुथा आणि त्याच्या दवाखान्याचे नाव आहे.महावीर हाॅस्पिटल. हे महावीर हाॅस्पिटल गोरगरीब,सर्वसामान्य नागरिकांना आपल वाटत.या दवाखान्यात नाणे मावळ,आंदर मावळ व पवन मावळातील सगळ्या विद्यार्थ्यावर,शिक्षकांवर मोफत औषधोपचार केले जातात.
शाळेच्या समोरच कामशेतची पंडीत नेहरू विद्यालय आहे,तिथल्या विद्यार्थ्यांला साध खरचटल,ताप आला,डोक दुखल तरी महावीर हाॅस्पिटल मध्ये उपचार केले जातात.रेल्वे अपघातात अनेक गर्दुले दुखापत होते,त्याच्या कडे कोणाचे लक्ष नसते. घरचे ही वैतागलेले असतात,अशा अपघातग्रस्तांना येथेच मोफत उपचार केले जातात
आणि उपचाराची ही रक्कम हजारांच्या घरातही असते,ही सगळी चॅरिटी करावी लागते. डाॅक्टर मुथाच्या दवाखान्यात गोरगरीब आणि सर्वसामान्य माणूस येतो. कामशेत शहरातील स्वच्छता कर्मचारी,पंचक्रोशीतील आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स,अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठवलेले रूग्ण यांची येथे देखभाल होते. पैसे असो वा नसो येथे पैसा वाचून कोणाचेही उपचार रखडत नाही.
आता पर्यत ग्रामीण भागात अनेक मोफत आरोग्य तपासणी शिबीर डाॅक्टर मुथा आणि टीमने घेतली. जैन साधुसंताची मोफत सेवा करणारे मुथा,आळंदी,पंढरपूरला पायी जाणा-या वारक-यांची तितकीच मनोभावे सेवा करतात. वारीत त्याचा आरोग्य तपासणी शिबीराचा कॅम्प असतो. वारीतील वारक-यांना थंडी,ताप,उलट्या,जुलाबाची औषध पुरतील इतके ते सोबत पाठवत असतात.रात्री बारा वाजता फोन केला तरी स्वत:उठून दवाखान्यात रूग्णांच्या उपचारासाठी येत असतात. डाॅक्टर सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. जिथे जिथे मदतीची हाक येईल तेथे हा माणूस मदतीला उभा असतो. फुल ना फुलाची पाकाळीची मदत महावीर हाॅस्पिटल मधून केली जाते.
मग ही मदत शैक्षणिक असो की सामाजिक एका हाताने मदत केली तर दुस-या हाताला त्या मदतीचा तपास नसतो. ज्ञानेश्वरी निरूपण सोहळा करून ज्ञानेशवरीचे विचार त्यांनी घरोघरी पोहचवले. कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गुणी जणांच्या पाठीवर त्यानी कौतुकाची थाप दिली.आदिवासी पाड्यांवर सार्वजनिक दिवाळी महोत्सवाला त्यानी व्यापक स्वरूप दिले.
कोरोनाच्या लढाईत लढलेल्या अनेकांचा त्यांनी जाहीर सत्कार करून त्यांना गोड जेवण दिले.
महावीर हाॅस्पिटल मध्ये रडत आलेला माणूस जाताना हसत हसत जातो,याचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे .राजकीय जीवनात त्यांनी उत्तम काम केले,ते स्वतः उपसरपंच होते.भावजय सरपंच होती,पत्नी सदस्य आहे. लोकहिताची कामे केल्या शिवाय सार्वजनिक जीवनात ही पदे सहजासहजी मिळत नाही याचाही विचार केला पाहिजे.

