तळेगाव दाभाडे:
शुक्रवारी (दि.३०) ला पवन मावळातील पूर्व भागात गारांचा पाऊस पडला. अवकाळी पडलेल्या गारपीटीचा फटका शेतक-यांना बसणार आहे. या गारपीटीत आंब्याच्या कै-या झडल्या.
शुक्रवारी सकाळ पासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास काळे ढग जमा झाले आणि काही वेळाने जोरदार पाऊस पडला. पत्राच्या छप्परावर गारांचा तडतड आवाज येत होता.
अर्धा तास पडलेल्या पावसात जनावरांचा चारा, शेणाच्या गोव-याही भिजून गेल्या
आढले बुद्रुक सह पंचक्रोशीत पडलेल्या गारांच्या पावसाने वीटभट्टी उत्पादकांचेही नुकसान केले.

error: Content is protected !!