स्त्री पुरूष समानतेचा धागा महात्मा जोतीराव फुले यांनी गुंफला. तोच धागा आज घरोघरी तितकाच तितक्याच अतूट बंधनाने गुंफला जातोय,पुरूष मग ते वडील असो,भाऊ असो की पती त्याच्या भरवशावर त्याच्या पाठिंब्यावर कितीही आवाहने सहज पेलता येतात. मणिषा यादव सुवासिनीचा हा अनुभव.
यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री खंबीर पणे जितकी उभी असते,त्या पेक्षा एक पुरूष एका स्त्रीच्या मागे कित्येक पट खंबीरपणे उभा राहून तिची सुख दु:ख समजून घेतो, तिला ज्या क्षेत्रात करिअर करायचे त्या क्षेत्रात प्रेरणा, प्रोत्साहन देऊन मदत ही करतो.
हा अनुभव घेतलाय मनिषा विठ्ठल यादव या महिलेने. मणिषा माहेरची मनिषा भाऊसाहेब नवले ती भेंडा गावची.अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव.
तिच्या माहेरी आई ,वडील व तीन बहिणी .तिला भाऊ नसल्यामुळे वडिलांचे विचार मुलीनी जास्त शिक्षण घेऊन पुढे जाण्याचा व स्वतःच्या पायांवर उभे तयार नव्हते.पण मुली शिकल्या पाहिजे हा त्यांचा अट्टाहास मात्र होता.
त्यामुळे त्याच्या परीने त्यांनी मुलींचे शिक्षण केले. मणिषाचे १२ वी पर्यंत झाले ,तिला लहानपनापासून काहीतरी करण्याची आवड होती .१२ नंतर तिचे लग्न विठ्ठल दुर्योधन यादव यांच्याशी झाले. तिथून पुढे तिच्या आयुष्यात ते काही बरे वाईट घडले.
त्यात पती विठ्ठल यांनी खूप पाठिंबा दिला .लग्नानंतर तिने बीए पर्यंत शिक्षण पूर्ण केले. मणिषा ची नणंद पूजा हाडके यांचाही तिला पाठिंबा आहे .पुढे नोकरी व्यवसाय कर असेही नणंदने सांगितले. त्यांनी मणिषा ला भारतीय जीवन विमा निगम महामंडळाची विमा सल्लागार होण्याचे सुचवले, व मदतही केली .
या क्षेत्रामध्ये आल्या वर मणिषाला उत्पन्नाचे साधन झाले.पण ती एल आय सी कडे कधी एक मार्केटिंग म्हणून पाहिले नाही .ही तर एक समाज सेवा म्हणून कार्य केले. यामध्ये लोकांनी तिला सांगितले की, मॅडम तुम्ही जगण्यापेक्षा मरणाचे फायदे सांगतात .पण आज मला त्याच बंधू-भगिनी ला धावून घेणारी हक्काची व्यक्ती वाटत आहे. त्यामुळे त्यामध्ये मी मार्केटिंग म्हणून न बघता मी एक समाजसेवा वाटते.
मणिषा एका सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी, आजच्या स्पर्धेच्या युगात एकाने कमवून घर चालत नाही. दिवसेंदिवस वाढणारी महागाई, आजारपण, मुलांचे शिक्षण आणि संगोपन यावर मोठा खर्च होत असतो. या शिवाय माणसाच्या गरजा काही कधी कमी होत नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे मिळेल त्या कामात आनंद मानला की कोणतेही काम समाजहिताचे असते यावर तिचा दृढ विश्वास आहे.
म्हणून ती आज मावळातील घरोघरी जाऊन आयुर्विम्याचे महत्व समजून सांगत आहे सोबतीला मेडिकल पाॅलीसी साठी तिचा आग्रह आहे. यात तिचा जितका नफा त्यापेक्षा आपले किती हित आहे हे पाहणे हिताचे नाही का ? हे सांगण्याचे एकच कारण आज मणिषाचा जन्मदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना तिची नणंद तिचे भरभरुन कौतुक करताना हे सगळे सांगत होती. मणिषा मॅडम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

error: Content is protected !!