सामाजिक कार्याचा वसा घेऊन ग्रामीण भागात उत्तम पत्रकारिता करणारा, संकेत जगताप हा पंचवीसीतील तरूण.सुस्वभावी संकेत जगतापने फार कमी कालावधीत पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे
ग्रामीण भागातील समस्या आणि त्यावरील निवारण हा त्याच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू आहे.
ग्रामीण भागातील समस्या,अडीअडचणी आणि समस्येवर त्याने नेहमीच बोट ठेवले आहे. यातून कुणाच्या उणिवा काढून त्यावर बोट ठेवायचंय असा,त्यामागील मुळीच हेतू नाही. परंतू ग्रामीण भागातील वास्तव समाजापुढे मांडले पाहिजे या त्याच्या प्रमाणाकि हेतूचे प्रतिक नेहमीच त्याने आपल्या खास शैलीतून कागदावर उमटवले.
पत्रकारिता हा मनापासून जपलेला छंद असतो,त्याची आवड असावी आणि संवेदनशील मनही असावे लागते या तीनही गुणांचा त्रिवेणी संगम असलेला हा तरूण,आपल्या पारंपरिक व्यवसायाच्या सोबत पत्रकारिता करीत आहे.
आंदर मावळ,ग्रामीण आणि दुर्लक्षित असा परिसर,परंतु तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत या परिसराचा सिंहाचा वाटा तरीही भाग राजकीय वर्तुळात कायमच दुर्लक्षित राहिला.स्वराज्याच्या घौडदौडीतील घोडदळाच्या टापा या भागातील कुसूर घाटाने विसापूर,लोहगड राजगडापर्यत पोहचल्या. तर स्वातंत्र्यपूर्व काळात वीजनिर्मितीसाठी टाटाचे धरण याच भागात बांधले .
सहकाराची मुहूर्तमेढ रोवून चाळीस गावातील दूध संकलनाचे जाळे येथे घट्ट विणले आणि पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाला दुधाचा पुरवठा झाला. धरण आंद्रा असो की,रिलायन्स,एचपीसीएलची वायूवाहिनी,वीजनिर्मिती साठी पवनचक्की असो शेकडो एकरचे संपादन झाले. या संपादनात शेकडो एकर शेती गेली,या अनुषंगाने वाढलेल्या प्रश्नाना संकेत सारख्या पत्रकार मित्रांनी नेहमीचे शासन दरबारी या भागाचे ग्राहाणे मांडले.
रस्ते,वीज,पाणी पुरवठा,निकृष्ट दर्जाची कामे, सांडपाणी,बंदिस्त गटार योजना अशा अनेक उणिवांवर संकेत नेहमीच बोट ठेवीत आला.या परिसरातील पर्यटन,रोजगार,शेती याही विषयाला त्याने हात घातला. अनेकांच्या कौतुकास्पद बातम्या सढळ हाताना लिहिल्या.
कित्येकांचा विरोधात बातम्या लिहून रोषही ओढावून घेतला पण हा पत्रकार खचला नाही,आपल्या स्मितहास्याने समोरच्या रागाचा तोरा पार कमी केला.
आजच सगळे मांडायचे कारण आज,त्याचा वाढदिवस. आजच्या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा.

error: Content is protected !!