टाकवे बुद्रुक:
आंदर मावळातील मानकुली गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरा समोर बारा घरे पथदिवे नसल्याने अंधारात होती, तेथे ग्रामपंचायतीने पथदिवे बसवल्याने हा परिसर उजळून गेला. त्याच झाल अस, येथील पथदिव्यांवर दिवे नसल्याची बातमी मावळमित्र न्यूज ने २७ एप्रिलला छायाचित्रासह प्रसिद्ध केली होती.
ग्रामपंचायत सदस्य संतोष मोधळे व ग्रामसेवक जगन्नाथ शिदोरे यांनी या कामात विशेष लक्ष घालून हे मार्गी लावले असल्याचे मनसेचे कार्यकर्ते भरत घाग याने सांगितले. मावळमित्र च्या बातमीची दखल घेत ग्रामपंचायतीने दोन दिवसात लाॅकडाऊन असताना, बाजारातून पथदिवे खरेदी करून पथदिवे लावून परिसर उजळला. रस्त्यावर पथदिवे नसल्याची तक्रार मनसे कार्यकर्त्यांनी मावळमित्र कडे मांडली होती. मावळमित्र ने मानकुली
येथे विजेचे खांब आहेत,विजेच्या खांबावर लाईटीचे दिवे आहेत. परंतु त्या लाईटी लागतच नाहीत, अशी स्थानिक गावक-यांची तक्रार आहे. गावातील लहान लहान मुले, वयोवृद्ध माणसं येथे फिरत असतात,लहान मुले खेळत असतात.
परंतु तिथे अंधारच. वीस दिवस पलटुन गेले तक्रार करून परंतु ग्रामपंचायतीचे लक्षच नाही. आम्ही सर्व कर भरूनही आम्हाला सुविधा उपलब्ध का नाही,अशी खंत गावकरी करीत आहेत.
संबंधितांना वारंवार विचारपूस करून सुद्धा कामे होत नाहीत,पथदिवे सुरू करा अशी मागणी करून याकडे दुर्लक्ष होत आहे.
गेल्या 2 महिन्यापासून मानकुली गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोरील (आवारातील) एलईडी लाईट गेलेली आहे. वारंवार विचारपूस केली जात आहे. तसेच सदर गेलेली लाईट लवकरात लवकर बदलून द्या अशी विनंती गेल्या दोन महिन्यानपासून केली आहे. तरीही तिकडे लक्ष दिले जात नाही. आत्ता पर्यंत फक्त आणि फक्त आश्वासने भेटली आहे.
आता जुनी पिढी नाही कि आम्ही लोक अंधारात रहायचं बाकीचे लोक ‌नेहमी‌ झोपलेले‌ असतात ‌.आम्ही प्रसार माध्यमाकडे गेलो की,मग तोंडावर येतो लवकरात लवकर लाईट हीच आमची अपेक्षा असल्याचे मनसेचे कार्यकर्ते ‌भरत घाग , सौरव ‌घाग यांनी व्यक्त केली,
अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली, ही बातमी वाचून ग्रामपंचायत प्रशासनाने ही तजवीज केली. या बदल स्थानिक गावक-यांच्या वतीने मावळमित्र परिवाराच्या वतीने ग्रामपंचायतीला धन्यवाद.

error: Content is protected !!