
तळेगाव दाभाडे:
प्रतिक बाळू अवचार ला योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेकडून त्याचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेने गॅस दाहिनी मध्ये कोरोना शव दहन करणाऱ्या चि.प्रतीक बाळू अवचार यांचा सन्मान केला.
सन्मान चिन्ह,शाल,श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप होते. पाच हजार रूपयाचा धनादेश देण्यात आला. संस्थेचे संस्थापक खंडुजी टकले म्हणाले,” आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो.प्रतीक जे काम करत आहे ते फार जोखमीचे आहे ,व कौतुकास्पद सुद्धाआहे.
स्वतःच्या जिवाची व आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या विचार न करता ह्या संकट काळात देखील वडिलांचा वारसा चालु ठेवला .
याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो.आताचा काळ खूपच कठीण आहे .माणूस माणसाच्या जवळ जायला घाबरत आहे .तरी न डगमगता प्रतीक त्याचे काम जबाबदारी मानुन पार पाडत आहे. तसेच कुटुंबातील सर्व जण हे कार्य करण्यासाठी प्रतीकला साथ देत आहेत. त्यांचे देखील कौतुक करावे तितके थोडेच आहे. संस्थेचे चेअरमन विजय शेटे, सचिव विनोद टकले ,संचालक मंगेश जोशी ,अमर खळदे ,व्यवस्थापिका सुनिता शेंडे ,वरिष्ठ लिपिक , रंजना जाधव, लिपिक गीता ठुबे हे उपस्थित होते.

