वडगाव मावळ:
सद्यस्थितीत कोरोनाने थैमान घातले आहे,याची भीती न बाळगता सकारात्मक विचार वाढवा, आपले आरोग्य आपल्या हातात आहे,असा विश्वास बाळगून महिलांनी रोज सकस आहार घ्यावा आणि कुटूंबातील प्रत्येकाला खाऊ घालावा असे आवाहन निगडे ग्रामपंचायतींच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सविता बबूशा भांगरे यांनी केले.
निगडेतील गरोदर माता, स्तनदा माता आणि कुपोषित मुले यांना एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मार्फत सकस आहार वाटप करण्यात आला यावेळी भांगरे बोलत होत्या.
निगडेतील पस्तीस महिला आणि चार बालकांना
पौष्टिक वडी देण्यात आली.यावेळी भांगरे यांनी महिलांशी संवाद साधून हितगुज केले. कोरोनाने सगळे दवाखाने फुल्ल आहेत. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन केले.
आरोग्य विभाग आपली सर्वतोपरी काळजी घेत आहे,अशा वेळी आपली सर्वाची सामूहिक जबाबदारी देखील आहे. याचे भान देखील आपण ठेवले पाहिजे. आपल्या कुटूबाची काळजी आपण घेऊ असा निर्धार महिलांनी व्यक्त केला.
प्रथम लोकनियुक्त सरपंच सविता बबुशा भांगरे अंगणवाडी सेविका रूख्मिणी भांगरे,पद्मा भागवत,पुष्पलता शेलार ,मदतनीस सुदेशना पाटारे,सुनिता शेलार यांच्यासह रोशनी साळवे ,अर्चना ठाकर ,गौरी कलवडे,ऐश्वर्या थरकुडे,दिपाली गाडे, दिक्षा थरकुडे आदि महिला उपस्थित होत्या
गावातील चार कुपोषित बालकांना या सकस आहाराचे वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!