वडगाव मावळ::
कशाळ येथे थ्री फेज कनेक्शन व पिचडवाडी येथे नवीन डीपी बसविण्यात यावी अशी मागणी कशाळ किवळेचे सरपंच मारुती रामू खामकर (सर),उपसरपंच तुळशीराम पोपट जाधव, ए. पी. सूर्यवंशी ग्रामसेवक यांनी केली आहे.
कार्यकारी अभियंता.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित वडगाव यांच्याकडे ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. कशाळ येथे गावामध्ये थ्री फेज कनेक्शन होणे गरजचे आहे, पिचडवाडी येथे नवीन डीपी बसविणे आवश्यक आहे याकडे ग्रामपंचायतीने महावितरणचे लक्ष वेधले आहे.
ग्रुप ग्रामपंचायत कशाळ हद्दीतील मौजे कशाळ व किवळे या दोन महसुली गावांचा व या गावांतर्गत पिचडवाडी, गव्हने बस्ती, काचाळणे वस्ती व डम फाटा यांचा समावेश होतो.
या दोन्ही गावांची मिळून लोकसंख्या अंदाजे २२०० च्या आसपास आहे. मौजे कशाळ येथे एक लाईन श्री फेज कनेक्शन ची असून इतर सर्व लाईन या सिंगल फेज कनेक्शन आहेत.
तसेच गावात ग्रामपंचायत पथदिवे व हायमास्ट दिवे त्याच लाईन वर आहेत. त्यामुळे गावात अधिकचा भार
वाढल्यास सिंगल फेज लाईन वारंवार खंडित होते. त्यामुळे लोकांना बहुतांशी वीज नसलेने अनेक गैरसोयींचा
सामना करावा लागतो. तसेच डीपी मधील फ्युज वारंवार बदलून ते निकामी होत आहे.
येथील सिंगल फेज कनेक्शनचे रुपांतर थ्री फेज कनेक्शन मध्ये करून मिळावे.तसेच किवळे येथील पिचडवाडी येथे एकूण २५ कुटुंब तसेच ५ पोल्ट्री व्यवसाय व ६ पोली हाउस आहेत.त्यांना सद्यस्थितीत किवळे येथील ट्रान्सफार्मर द्वारे विद्युत पुरवठा होत आहे.पिचडवाडी येथे सिंगल फेज कनेक्शन आहे.
परंतु पुरेसा दाबा अभावी वीजपुरवठा होत नाही त्यामुळे शेती औजारे, शासन मार्फत मिळणारी पीठ गिरणी अशी विजेची उपकरणे चालत नाही .तरी पिचडवाडी येथे नवीन डीपी बसवून मिळावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

error: Content is protected !!