वडगाव मावळ : जिल्हा परिषद व पंचायत
समिती सदस्य असोसिएशनच्या मावळ तालुकाध्यक्षपदी पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके यांची नियुक्ती करण्यात आली.
असोसिएशनचे मार्गदर्शक राम जगदाळे,
अध्यक्ष आशिष गोयल, कैलास गोरे यांनी कारके यांची नियुक्ती केली आहे. साहेबराव कारके हे मावळ पंचायत
समितीचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणून कार्यरत आहेत.
ग्रामीण भाग पक्क्या रस्त्यांनी जोडणे, अंधारमुक्त करणे, खेड्यांचाविकास करणे, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कामकाजात सुधारणा करणे आदी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कारके यांनी सांगितले.

error: Content is protected !!