पिढीजात शेतीशी आणि वारकरी संप्रदायाशी जोडलेली नाळ.त्यामुळे शेतीच्या बांधावर, वावरात फिरण आलेच. आई वडिलांच्या सोबतीने शेतातील कामाची उपजतच आवड होती. तीही काम ओघाने आलीच, शेती आणि गाई वासरे मशागतीला बैल दुभत्या म्हशी आल्याच. त्या राखता राखता बालपण सरले. प्राथमिक शाळेत असतानाच धरणग्रस्त शेतकरी अशी कुटुंबियांची ओळख झाली.
पण याच वयात शेती सोबत व्यवसायिक होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू झालीच. टाकवे बुद्रुकचा हा तरुण स्वतःच्या व्यवसायात करिअर करू पाहतोय. कृपा लँन्ड डेव्हलपर्स असे या मित्राच्या व्यवसायाचे नाव असून अमरशेठ आत्माराम असवले हे त्याचे नाव.
लहानपणापासून आमची मैत्री, त्यामुळे आशा,आकांशाची आवड निवड महिती होतीच. सुस्वभावी आणि महत्वाकांक्षी मित्र भेटला याचे आज खूप समाधान आहे, अमर ( रामनाथ) ने शाळेत असतानाच आंदर मावळातील वाढत्या दुचाकीचा कल पाहून दुचाकी सर्विसिंग सेंटर साठी अॅटो मोबाईल चे दुकान सुरू केले.
यात जम बसवून टाकवे बुद्रुक गावा हे आदरंमावळ तील मुख्य बाजारपेठ येथे ऐनाऱ्या चाकरमान्यांचे हलपाहून श्रीकुपा हाँटेल हा व्यावसाय सुरू केले हा व्यावसाय त्यांचे लहान बंधू अजिंक्य असवले हा यशस्वी रिता पाहतो शेतीशी निगडित असणा-या व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित केले.
यातूनच उगम झाला कृपा लॅण्ड डेव्हलपर्सच्या व्यवसायाचा. यातून शेतीशी संबंधित कामे करता येतात, याशिवाय आंदर मावळात वाढत्या नागरीकरणामुळे या व्यवसायात यशही मिळेल या हेतूने हा व्यवसाय सुरू आहे.
याच्या जोडीने वेगवेगळ्या व्यवसायात आपला ठसा उमटविण्यासाठी आपला मित्र झटतो याचा आम्हाला आनंद आहे. सामाजिक जीवनातही सातत्याने मदती साठी पुढे असणारा अमर कुटूंबवत्सल आहे, आज अमरचा वाढदिवस या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा .
(शब्दांकन-रवि शंकर पवार ,पोलीस पाटील डाहूली)

error: Content is protected !!