वडगाव मावळ:
कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले आहे,प्रशासन आपल्या परीने राबत आहेत,श्रम करीत आहेत. आरोग्य,पोलीस,सामान्य प्रशासन या कोरोना युद्धात आपले कर्तव्य बजावत आहेत.नागरिकांकडून शासनाच्या या नियमाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहे.
सर्वसामान्य नागरिकांना प्रती प्रश्न पडतील अशा प्रश्नांना निगडेच्या सरपंच सविता भांगरे हात घातला आहे, त्या म्हणतात,किती दिवस शासनाने सांगायचे, पाहूयात सरपंच सविता भांगरे काय म्हणतात,त्या पहिल्याच ओळीत सांगतात किती दिवस शासनाने
●किती दिवस शासनाने सांगायचे मास्क वापरा
●किती दिवस शासनाने सांगायचे विनाकारण बाहेर फिरु नका
●किती दिवस शासनाने सांगायचे कोरोना पॉझीटीव्ह व्यक्तीने कोव्हीड सेंटर मध्ये जावे,गावात फिरुन संक्रमण वाढवु नये
● किती दिवस शासनाने सांगायचे गर्दी करु नका,लग्नसोहळे मोठ्या दिमाखात करु नका ,यात्रा जत्रा रद्द करा
● किती दिवस शासनाने सांगायचे स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या
● किती दिवस आशा सेविका ,अंगणवाडी सेविका ,आरोग्य कर्मचारी ,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालुन सर्वेक्षण करायचे
●किती दिवस सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक,पोलीस पाटील यांनीच तुमचेवर लक्ष ठेवायचे,चांगले सांगायला गेले की तुम्हाला गावकरी मिञांना राग येतो मग का या सर्वांनी गावाला वाईट व्हायचे,त्यांना पण कुटुंब आहै ,वृध्द आई वडील आहेत,लहान मुल बाळ आहेत
●किती दिवस शासनाने सांगायचे कोवीड लसीकरण सुरक्षित आहे ,४५ वर्षपुढील वयाचे १०० % नागरीकांनी का नाही घेतली मग लस?
●किती दिवस पोलीसांनी तुम्हाला मारुनच समजावयाचे
●किती दिवस जिल्हाधिकारी तहसीलदार,गटविकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,पोलीस निरिक्षक यांनी अहोरात्र कोरोना योध्दा बनुन तुमची सेवा करायची
●परदेशातील कोरोना देशात आला ,देशातील कोरोना राज्यात,राज्यातला कोरोना आपल्या जिल्हात आला ,जिल्हातुन तालुक्यात,तालुक्यातुन गावात,गावातुन आपले घरात आला
अरे मग किती दिवस तुम्हाला समजुन सांगायचे
जीवनावश्यक काहीच नाही,जीवन आवश्यक आहे
● किती दिवस शासनाने सांगायचे आता तरी गंभीर व्हा,व्हेंटीलेटर चे बेड नाही,ऑक्सिजन नाही,रेमडीसीवर इंजेक्शन नाही देवाच्या रुपात काम करत असलेले डॉक्टर,आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या सहनशक्तीचा अंत पाहु नका घरी रहा सुरक्षीत रहा
●किती दिवस शासनानेच प्रत्येक गोष्ट सांगायची
देशाचे नागरीक म्हणुन आपली काहिच जबाबदारी नाही का ?
स्वतःची,कुटुंबाची ,वृध्द आई वडिलांची,लहान बालकांची खरच तुम्हाला काळजी वाटत नाही का ?
●मृत्युचे तांडव पाहीले ,कुटुंब पोरकी झाली तरी आपण गंभीर नाही का ?
●आता शेवटच सांगत आहोत, गावकरी बंधु भगीनी, मातांनो स्वतःला आणी सोन्यासारख्या गावाला जपा अशी विनंती वजा आग्रह कोरोना दक्षता समिती
ग्रामपंचायत कार्यालय निगडे यांनी केली आहे.

error: Content is protected !!