सोमाटणे:
कोरोना हा संसर्गजन्य आजार असून हा विषाणू वेगाने पसरतो.तसेच अनेकदा तो थेट फुफ्फुसावर हल्ला चढवतो.त्यामुळे औषधोपचारांबरोबरच रुग्णाला प्लाझ्मा देणे गरजेचे ठरते.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.
त्यामुळे आँक्सिजन,औषधे यांबरोबरच प्लाझ्माचाही तुटवडा जाणवत आहे.यासाठी प्लाझ्मा डोनर शोधावे लागत आहेत.शेलारवाडी ता.मावळ येथील किशोर माळी यांनी काही दिवसांपूर्वीच प्लाझ्मा दान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली होती.
पण सध्याची परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याने त्यांनी पुन्हा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला.त्यांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालय,पिंपरी येथे जाऊन स्वतःहून प्लाझ्मादान केले.किशोर माळी यांच्या सारखी प्लाझ्मादान करणारी माणसे पुढे आली तर निश्चितच आपण सर्वजण या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो.
“कोणाचे तरी जीवन वाचवण्यासाठी आपण उपयोगी पडावे असे मला नेहमी वाटायचे.
म्हणूनच मी प्लाझ्मादान करण्याचा निर्णय घेतला असे किशोर माळी म्हणाले. माझ्याप्रमाणेच इतरांनीही प्लाझ्मादान करुन या संकटावर मात करण्यास हातभार लावावा,असे आवाहन त्यांनी केले.खरचं अशी सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं म्हणजे परिसच.

error: Content is protected !!