वडगाव मावळ:
इलेक्ट्रिक दुकानात दोन दिवसाची कशीबशी नोकरी त्याने केली. पण या नोकरीत मन रमेना म्हणून हा पठ्ठ्या नोकरी सोडून दुकानातून घरी निघून गेला.पण तो आज दहा जणांचा पोशिंदा झाला. माझ्या वडिलांचा पारंपरिक व्यवसाय नीटनेटका संभाळला तरी मी,यात करिअर करीन हा विश्वास बाळगून दुकानात बाहेर पडलेल्या या महाविद्यालयीन तरूणाने आपल्या व्यवसायात करिअर केलेच.
त्याच्या या कर्तृत्वाचा आई वडीलांना सार्थ अभिमान आहे.थूगावच्या शेतकरी कुटूंबातील कुंडलिक बाळासाहेब वाघोले असे या महाविद्यालयीन तरूणाचे नाव. त्याचे
वडील बाळासाहेब अमृता वाघोले थूगावचे उपसरपंच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते. पक्षनिष्ठा त्याच्या ठायी ओतप्रोत भरलेले. पण तेही हाडाचे शेतकरी आणि कमालीचे जिद्दी आणि चिकाटी असलेले मावळे. आई
रूख्मिणी,शेतीशी तिचीही नाळ जोडलेली. दिवसभर काबाडकष्ट करीत प्रपंचाचा रहाटगाडा हाकणा-या आणि कष्टाला देव मानणा-या बाळासाहेब आणि रूख्मिणी यांचा कुंडलिक हा चिरंजीव.
तो शिवणेतील शाळेत दहावी पर्यत शिकलेला,इंद्रायणी महाविद्यालयात बारावी आर्ट्सचा विद्यार्थी. विद्यार्थी दशेत तळेगावात एका इलेक्ट्रिकल्स दुकानात दोन दिवसाची नोकरी कशीबशी नोकरी केली,दोन दिवस त्याने दुकानात विचाराच्या काहुरात घालवले. मी काही तरी करीन ते स्वतःच्या व्यवसायात या विचाराने त्याने दुकान सोडले आणि थेट घर गाठले.
वडीलांचा परंपरागत इलेक्ट्रिकल ठेकेदारीचा व्यवसाय,त्याला अंगाखांद्यावर घेऊन पुढे जायचं होत म्हणून तो वडीलांच्या सोबत महावितरणच्या कार्यालयात गेला,या कार्यालयाचे उंबरे त्याने झिजवले. थोडी थोडी माहिती घेत,त्याचा अभ्यास करीत तो पुढे जाण्यासाठी धडपडत होता. या धडपडण्या मागे होता,त्याच्या वडिलांचा संघर्ष.
त्याच्या वडिलांनी शून्यातून व्यवसाय उभा केला होता,त्याचे आजोबा वारले,कमी वयात वडिलांवर घराची जबाबदारी आली. ही जबाबदारी पेलताना कष्ट खूप केले,घरची परिस्थिती नाजूक होती,दोन वेळेस जेवण मुश्किल होते.त्याचे वडील खाजगी कारखान्यात नोकरी करीत होते,ती नोकरी ही गेली.नोकरी गेली म्हणून त्यांनी दुसऱ्याच्या वावरात मोलाने नांगरणीची कामे करायला सुरवात केली.
दुसऱ्याच्या औतावर जवाई काम करतोय,हे सासऱ्याने पाहिल्यावर त्यांनी कुंडलिकचे वडील बाळासाहेब वाघोले यांना इलेक्ट्रिकल ठेकेदाराकडे कामाला लावले.सास-याच्या शब्दाला कमी पणा येऊ नये,म्हणून तेही काम करीत राहिले,नव्याने शिकत राहिले.या व्यवसायात शिकले,या अनुभवातून त्यानी छोटीमोठी कामे घ्यायला सुरुवात केली होती.
याच दरम्यान,कुंडलिक दोन दिवसाची नोकरी सोडुन घरी आला होता,आता बापलेक दोघे मिळून इलेक्ट्रिकल कामे करीत होते. मुलगा मदतीला आला होता. या ओळखीतून त्यांनी कुंडलिकच्या नावावर इलेक्ट्रिकल
ठेकेदाराची परवाना काढला .अनुभवातून बापलेक दोघे शिकले होते. याच व्यवसायात करिअर करायचे म्हणून काम करीत राहिलेले.
जनसंपर्क वाढला,दर्जेदार कामे केली, वैयक्तिक रिलेशन वाढवले,त्यामुळे व्यवसाय वाढला.
शेतीपंपासाठी वीजेचे खांब खोदाई करून वीजवाहक खांब रोवायचे,ट्रान्सफॉर्मर बसून दयाचा,अशी कामे बापलेक करू लागले. मावळात नागरीकरण वाढल,औद्योगिकीकरण वाढल,रेसिडेन्सी,व्यवसायिक अशी कामे वाढली,परिणामी वाघोले पितापुत्र या कामात तनमन झोकून काम करू लागली. गरिबीचे दिवस सरले हाताला चारपैसे मिळू लागले,गावात आणि सामाजिक जीवनातही यश मिळाले,वडील उपसरपंच झाले,लेकीलाही आनंद झाला.
वडिलांची साथसोबत होतीच आता मामा सोमनाथ सुतार भाच्याच्या पाठिशी खंबीर पणे उभा आहे.कुंडलिकच्या यशाचे त्याचे नातेवाईक आणि मित्राना अभिमान आहे. २३एप्रिल कुंडलिकचा वाढदिवस या दिवशी त्याच्या मित्रांकडून दोन दिवसाची नोकरी अशी चर्चा निघाली,आणि कुंडलिक च्या डोळ्यात गतकाळ आठवला.याच दिवशी कुंडलिकची कन्या अहिल्या हिचा ही वाढदिवस आहे.

error: Content is protected !!