वडगाव मावळ:
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात वेगवेगळी लक्षणे दिसू
लागली आहेत. या लक्षणांपैकी एक मुख्य लक्षण म्हणजे घसा खवखवणे. या समस्येकडे दुर्लक्षित करण्यापेक्षा डॉक्टरांशी ताबडतोब संपर्क साधणे केव्हा ही चांगले. काही वेळा हवामानातील बदलांमुळेही ही घसा खवखवतो.
यासाठी काही घरगुती उपचार करू शकतो.
घरगुती उपाय
●कोमट पाण्यात व्हिनेगर किंवा मीठ घाला
कोमट पाण्यामध्ये व्हिनेगर किंवा मीठ घालून गार्गल
करा त्यामुळे घशा दुखणे, घसा खवखवणे आणि इतर
समस्यांपासून आराम मिळेल.
●आले पाणी
आल्यामध्ये जीवनसत्त्वे, लोह, अँटी-व्हायरस, अँटी बॅक्टेरियल आणि औषधी गुणधर्म आहेत.
आल्याचे पाणी पिण्यामुळे घशातील खवखवीपासून
आराम मिळतो.आल्याचा एक तुकडा सोलून घ्या आणि
पाण्याने धुवा. दोन ग्लास पाणी आणि आले घाला.
पाणी एक ग्लास एवढे होई पर्यंत उकळा. तयार केलेले पाणी गाळल्यानंतर त्यात एक चमचा मध मिसळावे आणि घोट-घोट प्यावे.
●काळी मिरी आणि देशी तूप
घशाच्या खवखवीपासून मुक्त होण्यासाठी काळी मिरीची पूड थोड्याशा देशी तुपासोबत किंवा बत्ताशांसह खा. याशिवाय काळी मिरी 2 बदामांसोबत बारीक पूड करून खाल्ल्यासही फायदा होईल.
●काळी मिरी आणि तुळशीचा काढा
आपण यासाठी काळी मिरी आणि तुळस काढा तयार करूनही पिऊ शकता. यासाठी पॅनमध्ये एक कप पाणी, चार पाच काळीमिरी आणि तुळशीची पाच पाने उकळा. तयार केलेला काढा गाळून घ्या आणि झोपेच्या आधी ते प्या.
यामुळे घश्याच्या समस्या दूर करण्यात मदत होईल. तसेच, रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे आपल्याला इतर व्हायरल संसर्ग आणि कोरोना विषाणूंपासून
वाचण्यापासून प्रतिबंधित करते.

error: Content is protected !!